बाबाने कागदाचे 100 तुकडे करुन नवऱ्याला बाथरुममध्ये पाठवलं, मग असं कांड केलं, ज्याने सगळेच हादरले

मुलगा जन्मल्यानंतर आजारी राहू लागला. आम्ही मुलाचे अनेक ठिकाणी उपचार केले. पण त्याला बरं वाटलं नाही. त्यानंतर आम्हाला कोणीतरी सांगितलं की, फर्रुखनगरच्या गौशाळेत आमच्या मुलावर उपचार होऊ शकतात.

बाबाने कागदाचे 100 तुकडे करुन नवऱ्याला बाथरुममध्ये पाठवलं, मग असं कांड केलं, ज्याने सगळेच हादरले
AI Genreated Photo
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 3:34 PM

एका महिलेने गोशाळेच्या बाबावर गंभीर आरोप केलाय. तिने या बाबा विरोधात तक्रार नोंदवलीय. महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की, “माझा एक वर्षाचा मुलगा आहे. तो आजारी असतो. त्याच्यावर उपचार करण्यासाठी मी नवऱ्यासोबत फर्रुखनगरच्या एका बाबाकडे गेली. तेव्हा त्या बाबाने माझ्यावर बलात्कार केला. आधी त्याने माझ्या नवऱ्याला काहीतरी बहाण्याने बाथरुममध्ये पाठवले. त्यानंतर दरवाजा बंद करुन अब्रु लुटली” हरियाणाच्या गुरुग्राममधील ही घटना आहे.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बाबा विरोधात FIR नोंदवलाय. त्याला अटक केली. आरोपी विरोधात पुढील कारवाई सुरु आहे. फर्रुखनगर येथील गोशाळेच हे प्रकरण आहे. पीडित महिलेने सांगितलं की, “आम्ही बिहारच्या मुजफ्फरनगर येथे राहतो. माझा नवरा गुरुग्राम येथे मजुरीच काम करतो. त्यामुळे आमचं कुटुंब येथेच राहतं. मागच्या वर्षी मी एका मुलाला जन्म दिला”

झाड-फूंक करावं लागेल असं सांगितलं

मुलगा जन्मल्यानंतर आजारी राहू लागला. आम्ही मुलाचे अनेक ठिकाणी उपचार केले. पण त्याला बरं वाटलं नाही. त्यानंतर आम्हाला कोणीतरी सांगितलं की, “फर्रुखनगरच्या गौशाळेत आमच्या मुलावर उपचार होऊ शकतात. तिथल्या बाबाच नाव मनोज कुमार आहे. ते आमच्या मुलाला त्यांच्या औषधाने बरं करु शकतात. म्हणून शनिवारी आम्ही फर्रुखनगरला आलो” बाबाने मुलाला बरं करण्यासाठी झाड-फूंक करावं लागेल असं सांगितलं.

‘माझा नवरा बाहेरुन दरवाजा ठोठावत होता, पण’

“बाबाने एका कागदाचे 100 तुकडे केले. माझ्या नवऱ्याला कागदाचे तुकडे फेकण्यासाठी बाथरुममध्ये पाठवलं. पती बाबाच्या सांगण्यानुसार बाथरुमच्या दिशेने गेला. त्यावेळी बाबाने दरवाजा बंद केला आणि माझ्यावर बलात्कार केला. माझा नवरा बाहेरुन दरवाजा ठोठावत होता. पण बाबाने दरवाजा उघडला नाही गोंधळ घातल्यानंतर बाबाने दरवाजा उघडला. पण तो पर्यंत तो गुन्हा करुन मोकाळा झाला होता” असं पीडित महिलेने सांगितलं. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केलाय. आरोपी बाबा मनोज कुमारला रविवारी अटक केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.