‘वेस्टर्न ड्रेसमध्ये सेक्सी दिसतेस’ युनिव्हर्सिटीच्या डीनची महिला प्रोफेसरबद्दल धक्कादायक भाषा

'नवरा तुझ्याजवळ नसेल, तेव्हा मला हॉटेलमध्ये भेट'. 28 एप्रिलला काय घडलं? ते सुद्धा या महिलेने सांगितलं. युनिव्हर्सिटीच्या आवारातील रुममध्ये डीनने आपल्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला, असा आरोप महिला प्राध्यापकाने केलाय.

'वेस्टर्न ड्रेसमध्ये सेक्सी दिसतेस' युनिव्हर्सिटीच्या डीनची महिला प्रोफेसरबद्दल धक्कादायक भाषा
Representative image
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 12:36 PM

नवी दिल्ली : हरयाणाच्या गुरुग्राम युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक असलेल्या एका महिलेने विद्यापीठाच्या एका विभागाच्या डीनवर गंभीर आरोप केला आहे. आरोपी युनिव्हर्सिटीमधील फार्मास्युटिकल साय़न्स विभागाचा डीन आहे. आरोपी डीनने आपला विनयभंग केला तसच धमकावलं, असा गंभीर आरोप महिला प्रोफेसरने केला आहे. आरोपी डीन नेहमी आपल्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत असतो, असं महिला प्रोफेसरने म्हटलय.

“वेस्टर्न लूकमध्ये तू सेक्सी दिसतेस. नवरा तुझ्याजवळ नसेल, तेव्हा मला हॉटेलमध्ये भेट” अशा कमेंट तो मला पाहून करतो, असं महिला प्रोफेसरने म्हटलय. माझ्या शरीराबद्दलही तो अयोग्य पद्धतीने टिप्पणी करतो. असं महिलेने म्हटलय. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.

कुठल्या कलमातंर्गत FIR ?

महिला प्रोफेसरने गुरुग्रामच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये युनिव्हर्सिटीच्या एका विभागाच्या डीन विरोधात FIR नोंदवलाय. विनयभंगाच कलम 354 आणि कलम 506 अंतर्गत एफआयआरची नोंद झालीय.

युनिव्हर्सिटीच्या आवारातील रुममध्ये डीनने काय केलं?

डीनच्या अशा कमेंट्समुळे महिला अस्वस्थ व्हायची, तिने अशा कमेंट करु नको, म्हणून डीनला सांगितलं. त्यानंतर डीनने आपल्याला टार्गेट करायला सुरुवात केली, असं महिला प्रोफेसरने सांगितलं. 28 एप्रिलला काय घडलं? ते सुद्धा या महिलेने सांगितलं. युनिव्हर्सिटीच्या आवारातील रुममध्ये डीनने आपल्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला व विनयभंगाचा प्रयत्न केला, असा आरोप महिला प्रोफेसरने केलाय. पदावरुन काढून टाकण्याची डीनने आपल्याला धमकी दिली, असं महिला प्रोफेसरने सांगितलं. व्हाइस चान्सलरने या प्रकरणात काय केलं?

ज्या दिवशी हे घडलं, त्याचदिवशी संबंधित महिला प्रोफेसर युनिव्हर्सिटीच्या व्हाइस चान्सलरला भेटायला गेली, पण VC ने भेटण्यास नकार दिला. युनिव्हर्सिटीचा व्हाइस चान्सलर आणि रजिस्ट्रार माझ्याविरोधात काही कारवाई करणार नाही, कारण माझे खूप कनेक्शन्स आहेत, असं डीनने आपल्याला सांगितल्याच महिलेने FIR मध्ये म्हटलय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.