चिकन मिळालं नाही म्हणून राडा, दुकानाच्या मालकाच्या डोक्यात थेट.. कुठे घडली ही धक्कादायक घटना ?
चिकन सेंटरच्या मालकाने चिकन देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपींनी तेथेच गदारोळ माजवला. त्यानंतर त्यांनी दुकानाच्या मालकालाही मारहाण केली. दारूची बाटली थेट त्याच्या डोक्यावर...

ग्वाल्हेर | 13 सप्टेंबर 2023 : मित्रांसोबत चिकन खायला गेलेल्या काही तरूणांनी दुकानाच्या मालकालाच मारहाण (beat up owner) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी तंदुरी मुर्गा (डिश) ऑर्डर केली होती, मात्र दुकानाच्या मालकाने ती देण्यास नकार दिल्यावर संतापलेल्या तरूणांनी आरडाओरडा सुरू करत गदारोळ माजवला. त्यानंतर दुकानमालकाला मारहाणही (crime news) केल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर त्यांनी त्या मालकाला कारमध्ये चढवून त्याचे अपहरण करण्याचाही प्रय्त केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे घडली. सोमवारी रात्री काही तरूण कारने शहरातील पंजाबी चिकन सेंटरमध्ये आले होते. त्यांनी एक तंदुरी मूर्ग ही डिश ऑर्डर केली व ते कारमध्ये बसून दारू पिऊ लागले. पण दुकानाच्या मालकाने त्यांना दुकानसमोर दारू पिऊ नका असे सांगितले असतात, त्यांनी त्याला शिवागळा सुरूवात केली. अखेर चिकन सेंटरच्या मालकाने त्यांना चिकन देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या तरूणांनी आरडाओरडा करत वाद घालण्यास सुरूवात केली. आणि त्याला मारहाण करत एका क्षणी त्याच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुकान मालकाला रुग्णालयात नेण्यात आले असता त्याच्या डोक्याला आठ ठाके पडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कारमध्ये बसवून अपहरण करण्याचाही प्रयत्न
चिकन सेंटरच्या मालकाने गोंधळ घालणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावरून हल्लेखोरांनी हाणामारी सुरू केली. या भांडणात आरोपीने त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारली आणि जबरदस्तीने गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरल्यानंतर चोरटे पळून गेले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.