घरी मित्रांसोबत मस्त पार्टी रंगली… नंतर पार्टी थेट पोलीस ठण्यातच गेली, तक्रार दाखल केल्यानं उडाली खळबळ
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या योगीता यशवंतराव यांनी घरातून साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा आरोप केला आहे.
नाशिक : नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका महिलेने एक तक्रार केल्यानं खळबळ उडाली आहे. तक्रारीतील पार्टी आणि त्यानंतर झालेली चोरी सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरात राहणाऱ्या योगीता घनशाम यशवंतराव यांनी ही तक्रार दिला आहे. घरात पार्टीसाठी आलेल्या मित्रांनीच तब्बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रारीत म्हंटले आहे. तिघांवर हा संशय घेतला असून महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम आणि दागिने चोरीचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. याच तक्रारीची चर्चा आता नाशिक शहरात होऊ लागली असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. सायंकाळी सुरू झालेली पार्टी पहाटे पर्यन्त सुरू होती आणि त्याच दरम्यान ही घटना घडल्याचा संशय तक्रारदार महिलेला आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या योगीता यशवंतराव यांनी घरातून साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा आरोप केला आहे.
यामध्ये योगिता यांचे मित्र प्रियांका कैलास पवार, तेजस रावसाहेब पगारे, विशाल एकनाथ घन यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
यावेळी योगीता यांनी तक्रारीत घरात पार्टी सुरु असताना योगिता या तेजससोबत दोन वेळा बाहेर गेल्या आहेत. पहाटेपर्यंत पार्टी चालल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रकार समोर आला आहे.
मुंबई नाका पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात गळ्यातील सोन्याची चेन घालण्यासाठी कपाट उघडले असता योगिता यांना कपाट रिकामे असल्याचे आढळले असल्याचे म्हंटले आहे.
तक्रारदार योगिता यांनी तिघा मित्रांकडे चौकशी केली असता, याबाबत कुठलीही कल्पना नसल्याचे तिघांनी सांगितले होते.
त्यामुळे योगिता यांनी त्यांनंतर मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत दागिने आणि रोकड चोरीचा संशय व्यक्त करताना तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने चर्चा होऊ लागली आहे.