Nandurbar : डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेचा विवस्त्र करून छळ, प्रथेच्या नावाखाली नंदूरबारमध्ये धक्कादायक प्रकार
डाकीण असल्याच्या संशयावरुन एका महिलेला विवस्त्र करुन छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. नंदुरबारमध्ये (Nandurbar) सोशल मीडियावरून (Social Media) संबंधित महिलेचे व्हिडीओ व्हायल झाले आहेत. ही घटना कुठली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोली भाषेवरुन घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्याता वर्तवल्या जात आहे. याबाबत अंनिसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
नंदुरबार – डाकीण असल्याच्या संशयावरुन एका महिलेला विवस्त्र करुन छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. नंदुरबारमध्ये (Nandurbar) सोशल मीडियावरून (Social Media) संबंधित महिलेचे व्हिडीओ व्हायल झाले आहेत. ही घटना कुठली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोली भाषेवरुन घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्याता वर्तवल्या जात आहे. याबाबत अंनिसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ही घटना कुठली आणि संबंधीत पिडीत महिला कोण याबाबत पोलीस देखील तपास करत आहेत. मात्र राज्य आणि केंद्रीय महिला आयोगाकडे (National Commission for Women) याबाबत तक्रार करणार सल्याचे अंनिसने स्पष्ट केले आहे. नंदुरबारमध्ये डाकीण प्रथेबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातुनच या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार झाल्याची चर्चा आहे.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा तीव्र निषेध
गेल्या आठवड्याभरापासून एका महिलेचा सोशल मीडियावरती व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओला विवस्त्र करण्यात आले आहे. आसपासची लोकं तिला चटके लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिला विचारत आहेत की, तु डाकीन आहेस आणि कोणाकोणाला खाल्लं आहेस. हा खूपचं भयानक व्हिडीओ आहे, असे आत्तापर्यंत तीन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यावेळेस आपण स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा विचार करतो. दुसऱ्या बाजूला स्त्रियांचा इतका छळ करतो. डाळीण म्हणून जर छळ होत असेल तर ते अत्यंत निषेधार्य आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती याचा तीव्र निषेध करते. पोलिस प्रशासनाने याचा छडा लावला पाहिजे. काल याबाबतचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे अशी माहिती अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सरचिटणीस विनायक साळवे यांनी दिली.
पोलिस कसून चौकशी करीत आहेत
मागील दोन ते तीन दिवसांपासून एका महिलेचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. स्थानिक बोली भाषेमध्ये तिला काही प्रश्न विचारले जात आहे. तर त्या अनुशंगाने तिला डाकीन संबोधन्याचा हा प्रकार दिसून येतो. हा प्रकार नेमका कुठला आहे, त्याबाबत पोलिस तपास करीत आहेत. गावातल्या खबऱ्यामार्फत आम्ही चौकशी करीत आहोत. दोषी असलेल्या आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नंदूरबार पोलिसांनी सांगितली आहे.