10 वर्षाच्या मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने बलात्कार, व्हिडीओ काढून व्हॉट्सअॅपवर फिरवला, देश हादरला!
हरियाणातल्या रेवाडीमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर सात मुलांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 6 अल्पवयीन मुलं आहेत. (hariyana Minor Boys gang rape 10 year old Girl)
रेवाडी : हरियाणातल्या रेवाडीमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर सात मुलांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे (Rape on Minor Girl). धक्कादायक म्हणजे यातील 6 अल्पवयीन मुलं आहेत. नराधम मुलांनी घटनेचा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला आणि तो अनेकांच्या व्हॉट्सअपवर फिरवला. मुलीच्या वडिलांनी पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केलीय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. (hariyana Minor Boys gang rape 10 year old Girl)
मुलगी अंगणात खेळत होती अन्…
अल्पवयीन मुलगी इयत्ता तिसरीत शिकत आहे. घराजवळच्या शाळेच्या अंगणात 25 मे रोजी ती खेळत होती. नराधम अल्पवयीन पोरांनी शाळेच्या मैदानात मुलीला खेळताना पाहिलं. सहा-सात जणांच्या टोळीनं तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करणारी ही मुलं अल्पवयीन आहेत. आठ ते चौदा या वयोगटातील आहेत. इतक्या लहान वयातील मुलांनी, असं कृत्य केल्याने सगळा देश हादरुन गेलाआहे.
बलात्काराचा व्हिडीओही मोबाईलवर शूट
नराधम पोरांनी बलात्कार तर केलाच पण घटनेचा सगळा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला. मोबाईलवर शूट केलेला व्हिडिओ संबंधित मुलांनी अनेकांच्या व्हाट्सअप वर पाठवला. ज्यावेळेस पोरांच्या वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस त्यांना देखील हादरा बसला.
आरोपी ताब्यात, पोलिसांचा तपास सुरु
हा मोबाईल व्हिडिओ कुणी शूट कोणी केला? तो कुणा-कुणाला पाठवला? यापाठीमागचं कारण काय होतं? याबद्दलची अधिक चौकशी पोलीस करत आहेत रेवाडीचे डीसीपी हंसराज यांनी तपासाची सूत्रं हातात घेतली आहेत. तूर्तास अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
(hariyana Minor Boys gang rape 10 year old Girl)
हे ही वाचा :
भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, क्रौर्याची परिसीमा गाठली, झाडाला लटकवलं