Harsh Sanghvi: बलात्काराला मोबाईल फोन जबाबदार; गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट

बलात्काराच्या घटना घडल्यावर नेहमीच पोलिसांना जबाबदार धरलं जातं. परंतु, अशा घटनांसाठी पोलिसांना दोष देणं योग्य नाही. अशा घटना या समाजावरील डाग आहेत, असं सांगतानाच मोबाईल फोनवर सहजपणे मिळणारे अश्लील व्हिडीओच बलात्काराच्या घटनांना जबाबदार आहेत.

Harsh Sanghvi: बलात्काराला मोबाईल फोन जबाबदार; गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट
बलात्काराला मोबाईल फोन जबाबदार; गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 5:59 PM

अहमदाबाद: बलात्काराच्या घटना घडल्यावर (Crime) नेहमीच पोलिसांना जबाबदार धरलं जातं. परंतु, अशा घटनांसाठी पोलिसांना दोष देणं योग्य नाही. अशा घटना या समाजावरील डाग आहेत, असं सांगतानाच मोबाईल फोनवर सहजपणे मिळणारे अश्लील व्हिडीओच बलात्काराच्या घटनांना जबाबदार आहेत, असं अजब तर्कट गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी (Harsh Sanghvi) यांनी वर्तवलं आहे. संघवी यांच्या या विधानावर आश्चर्य आणि संतापही व्यक्त केला जात आहे. बलात्कारासाठी शेजारील व्यक्ती किंवा नातेवाईक जबाबदार असतात हे एक महत्त्वाचं कारण आहे. नुकताच एक सर्व्हे झाला होता, त्यात बलात्काराला मोबाईल फोन (mobile phone) आणि ओळखीचे लोक जबाबदार असल्याचं स्पष्ट झालं आहे, असा दावाही संघवी यांनी केला आहे. संघवी यांच्या या विधानावर प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सिंघवी यांची कोंडी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

नेहमीच बलात्कारांच्या घटनांमध्ये पोलिसांना दोषी ठरवलं जातं. परंतु आम्ही अशा घटनांसाठी पोलिसांना दोषी ठरवत नाही. संपूर्ण देशात गुजरात हे सुरक्षित राज्य आहे. जर एक बाप लहान मुलीवर बलात्कार करत असेल तर त्याचं कारण म्हणजे मोबाईल फोन आहे, असं हर्ष संघवी म्हणाले.

तो सामाजिक इश्यू नाहीये का?

लोकांच्या सामाजिक विकृतीमुळेही बलात्काराच्या घटना घडत असल्याचं दिसून आलं आहे. जर एखादा बाप आपल्या मुलीवर बलात्कार करतो तर ती सामाजिक विकृती नाहीये का? असा सवालही त्यांनी केला.

म्हणून या घटना घडतात

मोबाईलमध्ये सहजपणे पॉर्न व्हिडीओ मिळतात. त्यामुळे अशा घटना घडत असतात. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकता अशा लोकांकडूनच अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या घटना घडत असतात. ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे लोक सावध होतील, असंही त्यांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

8 डिसेंबर 2021मध्ये सूरतच्या पांडसेरा परिसरात एका अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून त्याला फाशीची देण्यात आली होती. सीसीटीव्ही फूटेजवरून पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं होतं. चौकशी केली असता आरोपीच्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर पॉर्न व्हिडीओ सापडले होते.

संबंधित बातम्या:

VIDEO : अमरावतीत दोन गटात तुफान राडा, हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

अकोल्यात IB ची बनावट टोळी सक्रिय, Shiv Sena आमदाराच्या घरावर धाड

Bihar Crime : बिहारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक अत्याचार, पीडितेला रस्त्यावर फेकून आरोपींचे पलायन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.