अवघ्या 150 रुपयांवरुन वाद, जिगरी दोस्ताची निर्घृण हत्या, वडिलांसमोर विदारक दृश्य
23 वर्षीय आरोपी योगेंद्र हा मयत 26 वर्षीय तरुण दलीपचा मित्र होता. दलीप ढाब्यावरुन जेवण आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर दीडशे रुपयांवरुन योगेंद्र आणि त्याचा वाद झाला. त्यानंतर योगेंद्रने बेदम मारहाण करुन दलीपचा जीव घेतल्याचा आरोप आहे.
चंदिगढ : अवघ्या 150 रुपयांसाठी तरुणाने मित्राची बेदम मारहाण करुन हत्या (Friend’s Murder) केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर केवळ 48 तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकण्यात यश मिळवलं आहे. अटक करण्यात आलेला 23 वर्षीय आरोपी योगेंद्र हा मयत 26 वर्षीय तरुण दलीपचा मित्र होता. दलीप ढाब्यावरुन जेवण आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर दीडशे रुपयांवरुन योगेंद्र आणि त्याचा वाद झाला. त्यानंतर योगेंद्रने बेदम मारहाण करुन दलीपचा जीव घेतल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी दलीपचा मृतदेह ढाब्यापासून काही अंतरावर सापडल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला गजाआड केलं. हरियाणातील (Haryana) फरिदाबाद (Faridabad) शहरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपी योगेंद्र हा छायानसा पोलीस स्टेशन हद्दीतील गडखेडा येथील रहिवासी आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी खेडीपुल पोलीस ठाण्यात खुनाची घटना घडली होती. मयत तरुणाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, 29 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचा 26 वर्षीय मुलगा दलीप हा कामावरुन घरी परतला होता आणि जवळच्या ढाब्यावर जेवण आणण्यासाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला, मात्र 30 जानेवारीला सकाळी दलीपचा मृतदेह ढाब्यापासून काही अंतरावर असलेल्या एका पुलाजवळ सापडला. नातेवाईकांच्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
ढाब्यावरील भांडणातून हत्या
या प्रकरणी पोलिसांनी गडखेडा गावातील 23 वर्षीय योगेंद्र याला 1 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या प्राथमिक चौकशीत योगेंद्र आणि मयत दलीप हे मजुरीचे काम करत असल्याचे समोर आले. त्या रात्री दोघेही जेवायला ढाब्यावर गेले होते. योगेंद्रने ढाबा मालकाला पैसे दिले, तर उरलेले 150 रुपये दलीपने ठेवले. योगेंद्रने हे पैसे परत मागितल्याने दोघांमध्ये वाद वाढला आणि योगेंद्रने दलीपला बेदम मारहाण केली.
संबंधित बातम्या :
डॉ. सुवर्णा वाजेंसोबत घातपातच, डीएनए अहवालातून धक्कादायक माहिती, संशयाची सुई कोणावर?
पतीच्या खुनाची सुपारी देत पत्नीने उगवला सूड; प्रियकराच्या साथीने छळून मारले, मृतदेह दरीत फेकला, अन्…