सकाळी तरुणीसोबत हॉटेल रुम बूक, चार तासात असं काय घडलं, की तरुणाने तिचा गळा चिरला?

फरिदाबादच्या एनआयटी 5 ई रेल्वे रोड भागात असलेल्या हॉटेलच्या रुममध्ये थांबलेल्या युवकाने सोबत असलेल्या युवतीचा गळा चिरला. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरुन पसार झाला होता.

सकाळी तरुणीसोबत हॉटेल रुम बूक, चार तासात असं काय घडलं, की तरुणाने तिचा गळा चिरला?
क्राईम
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 10:03 AM

चंदिगढ : तरुणीला हॉटेलच्या रुममध्ये नेऊन तरुणाने तिचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुधारत असून धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून लवकरच युवतीचा जबाब नोंदवला जाणार आहे. हरियाणातील फरिदाबाद (Faridabad) जिल्ह्यात ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

काय आहे प्रकरण?

फरिदाबादच्या एनआयटी 5 ई रेल्वे रोड भागात असलेल्या हॉटेलच्या रुममध्ये थांबलेल्या युवकाने सोबत असलेल्या युवतीचा गळा चिरला. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरुन पसार झाला होता. त्याच्या आयडीवरुन त्याचं नाव यश अग्रवाल असल्याची माहिती मिळाली असून तो एसजीएम नगरचा रहिवासी आहे.

नेमकं काय घडलं

हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण-तरुणी चालत हॉटेलमध्ये आले होते. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी चेक-इन केले. अडीच रुपये देऊन त्यांनी रुम बूक केली. त्यानंतर दुपारी दोन वाजता युवक धावत-पळत हॉटेलमधून निघून गेला.

रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीचा आरडाओरडा

त्याला या अवस्थेत पळताना पाहिल्याने हॉटेलच्या स्टाफने त्याची रुम चेक केली, तेव्हा तरुणी गॅलरीत येऊन रक्तबंबाळ अवस्थेत आरडाओरड करत होती. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. तिने दोन्ही हातांनी गळा धरुन ठेवला होता.

तरुणीची प्रकृती धोक्याबाहेर

हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. रुग्णवाहिका बोलावून तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या तिच्या प्रकृतीचा धोका टळला आहे, मात्र ती जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कोणत्या हत्याराने तिचा गळा चिरला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हॉटेलच्या खोलीतही कुठलं शस्त्र पोलिसांना सापडलेलं नाही. कुठल्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि युवकाने टोकाचं पाऊल उचललं, हे तिच्या जबाबानंतरच समजेल, असं पोलिसांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

नऊ वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फूटेजने बिंग फोडलं

फाइव्ह स्टार हॉटेलच्या शाही विवाह सोहळ्यातून 12 तोळ्यांचे दागिने, दोन लाखांची रोकड लंपास!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.