पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, धारदार चाकूने 30 वेळा वार करुन हत्या
शत्रुघ्नला पत्नी पूनमच्या चारित्र्यावर संशय होता. तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं त्याला वाटत होतं. यावरून त्यांच्यात वारंवार वादही व्हायचे. घटनेच्या दिवशीही याच संशयातून त्याने आधी पत्नीशी भांडण केले. त्यानंतर पूनमच्या अंगावर धारदार चाकूने जवळपास 30 वेळा वार केले.
चंदिगढ : हरियाणातील सोनीपत शहरात पती-पत्नीच्या नात्याच्या ठिकऱ्या उडाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या अंगावर धारदार शस्त्राने 30 हून अधिक वेळा वार केले, यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.
हरियाणातील सोनीपत शहरात तारानगर येथे राहणाऱ्या शत्रुघ्न नावाच्या व्यक्तीला पत्नी पूनमच्या चारित्र्यावर संशय होता. हत्येच्या घटनेची माहिती मिळताच सोनीपत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली आहे.
काय आहे प्रकरण?
सोनीपतच्या तारानगरमध्ये राहणाऱ्या शत्रुघ्न आणि पूनम या दाम्पत्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. शत्रुघ्नला पत्नी पूनमच्या चारित्र्यावर संशय होता. तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं त्याला वाटत होतं. यावरून त्यांच्यात वारंवार वादही व्हायचे. घटनेच्या दिवशीही याच संशयातून त्याने आधी पत्नीशी भांडण केले. त्यानंतर पूनमच्या अंगावर धारदार चाकूने जवळपास 30 वेळा वार केले. यामुळे पूनमचा जागीच मृत्यू झाला.
विवाहितेच्या वडिलांच्या जबाबावरुन पतीवर गुन्हा
घटनेची माहिती मिळताच सोनीपतच्या सिव्हिल लाइन्स पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत पूनमचे वडील भगवान दास यांच्या जबाबावरून पोलिसांनी शत्रुघ्नविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या शोधात छापेमारी सुरु आहे.
चारित्र्याच्या संशयातून दाम्पत्यात वारंवार वाद
या प्रकरणाची माहिती देताना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तैनात असलेले उपनिरीक्षक राकेश कुमार म्हणाले की, तारानगरमध्ये पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. पूनम असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती शत्रुघ्न याला तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिची हत्या करण्यात आली. पूनमच्या अंगावर 30 हून अधिक वेळा धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणी पूनमच्या वडिलांच्या जबाबावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
संबंधित बातम्या :
“हॅलो पोलीस स्टेशन? माझा बॉयफ्रेण्ड माझ्याशी बोलत नाहीये” व्याकुळ प्रेयसीला पोलिसांचं उत्तर काय?
24 वर्षीय पुतण्या नवविवाहित काकीच्या प्रेमात, दोघं घरातून रफूचक्कर, काका म्हणतो मी तिला एकदाच…
बायकोचा दुसऱ्या नवऱ्यासोबत घरोबा, पहिला पती पोलिसात, म्हणतो ‘तिला नांदायला आणा म्हणजे आणाच…’