लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये प्रेयसी गर्भवती, प्रियकराने पेट्रोल टाकून पेटवले
सोनीपतमध्ये राहणारे प्रगती आणि राहुल हे बऱ्याच काळापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. प्रगती गर्भवती आहे. पण दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला. यानंतर राहुलने प्रगतीवर पेट्रोल टाकून पेटवून दिले
गुरुग्राम : लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये (Live In Relationship) राहणाऱ्या प्रियकराने गर्भवती प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. हरियाणाच्या (Haryana) सोनीपत जिल्ह्यातील कुंडली पोलीस स्टेशन परिसरात हे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. या घटनेत युवती गंभीररित्या भाजली आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिला दिल्लीच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सोनीपत पोलिसांनी दिल्लीत तरुणीचा जबाब नोंदवला असून प्रियकर आणि त्याच्या आईविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून कारवाई सुरु केली.
काय आहे प्रकरण?
सोनीपतच्या कुंडली पोलीस स्टेशन परिसरात राहणारे प्रगती आणि राहुल हे बऱ्याच काळापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. प्रगती गर्भवती आहे. पण दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला. यानंतर राहुलने प्रगतीवर पेट्रोल टाकून पेटवून दिले, त्यात प्रगती 90 टक्के भाजली आहे. प्रगतीला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रियकर आणि आईविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
तरुणीच्या जबाबावरून पोलिसांनी प्रियकर राहुल आणि त्याच्या आईवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाबद्दल माहिती देताना, कुंडली पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रणबीर सिंह म्हणाले की, आम्हाला दिल्लीच्या नरेला येथील रुग्णालयातून माहिती मिळाली होती की एका तरुणीला जळालेल्या अवस्थेत येथे आणण्यात आले आहे.
प्रेयसीवर दिल्लीत उपचार
घटनास्थळी पोहचून तपास केला असता, राहुल नावाचा तरुण आणि प्रगती नावाची तरुणी या परिसरात लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचे आढळून आले. राहुलने पेट्रोल टाकून प्रगतीला जाळले, त्यात ती 90 टक्के भाजली आहे. तिच्यावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीच्या जबाबानुसार राहुल आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
बिहारमध्ये एक्स गर्लफ्रेण्डने तरुणाला लुटलं
दुसरीकडे, दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलेल्या तरुणीनेच तिच्या साथीदारांच्या मदतीने पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लुटल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये समोर आली आहे. फिरायला जाण्याच्या बहाण्याने ती तरुणाला गंगेच्या घाटावर घेऊन गेली होती. तिथे तरुणी आणि तिच्या साथीदारांनी तरुणाला कारमध्ये बसवून शस्त्राच्या बळावर दागिने आणि मोबाईल फोन लुटला. तसेच त्याच्या बँक खात्यातील अडीच लाख रुपयांची रक्कमही दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली. त्यानंतर धमकी देऊन आरोपींनी युवकाला सोडून दिले. पीडित सनी दीपक उर्फ कबीर याने पीरबाहोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर बाबी नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली असून तिच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
संबंधित बातम्या :
दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीप, एक्स बॉयफ्रेण्डला पुन्हा भेटायला बोलावलं आणि…
खरेदी झाली, पैसे नव्हते, तिशीतील बहिणींच्या परवानगीने दुकानदाराचा अल्पवयीन मुलींवर बलात्कार