पाकिस्तानात महिला पोलिसाचे घृणास्पद कृत्य, महिला कैद्याला नग्न नाचवले

क्वेट्टाचे उपमहानिरीक्षक मुहम्मद अझहर अक्रम म्हणाले, 'तपासात असे आढळून आले की महिला निरीक्षकाने परी गुल नावाच्या महिलेला चौकशीसाठी आणले होते. हे प्रकरण क्वेट्टामधील जिना बस्ती भागात एका मुलाच्या हत्येशी संबंधित आहे.

पाकिस्तानात महिला पोलिसाचे घृणास्पद कृत्य, महिला कैद्याला नग्न नाचवले
पाकिस्तानात महिला पोलिसाचे घृणास्पद कृत्य
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 8:01 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एका महिला पोलिसाचे अतिशय घृणास्पद कृत्य उघडकीस आले आहे. त्यानंतर त्या महिला पोलिसावर कारवाई करीत तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या पोलीस महिलेने एका महिला कैद्याला कपडे काढायला लावले, त्यानंतर तिला तुरुंगात डान्स करायला लावले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे. आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलीस चौकशी समितीने निरीक्षक शहाना इर्शाद यांना दोषी ठरवले आहे.

पोलीस चौकशीसाठी महिला कैदीला आणले होते

शबानाने पोलीस कोठडी दरम्यान कारागृहात बंद असलेल्या महिला कैद्यासोबत अमानवी कृत्य केल्याचे समितीने म्हटले आहे. क्वेट्टाचे उपमहानिरीक्षक मुहम्मद अझहर अक्रम म्हणाले, ‘तपासात असे आढळून आले की महिला निरीक्षकाने परी गुल नावाच्या महिलेला चौकशीसाठी आणले होते. हे प्रकरण क्वेट्टामधील जिना बस्ती भागात एका मुलाच्या हत्येशी संबंधित आहे. जेव्हा महिला (परी गुल) पोलीस कोठडीत होती, तेव्हा महिला निरीक्षक शबानाने तिला केवळ नग्न केलेच नाही तर इतर कैद्यांसमोर नाचण्यासही भाग पाडले.

महिला पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ

न्यायालयाने पीडितेची कारागृहात रवानगी केली आहे. अक्रम म्हणाला, ‘लेडी इन्स्पेक्टरला तिच्या बचावात काही बोलायचे नव्हते. त्यामुळे तिला सेवेतून बळजबरीने निवृत्त करून बडतर्फ करण्यात आले आहे. महिला कैद्याची चौकशी करणे महिला निरीक्षकांना आम्ही बंधनकारक केले आहे, जेणेकरून तिला तुरुंगातही सुरक्षित ठेवता येईल.

पाकिस्तानात महिला सुरक्षित नाहीत

पाकिस्तानमध्ये महिलांविरोधातील गुन्हे वेगाने वाढत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की आता त्या तुरुंगातही सुरक्षित नाही. अलीकडे, महिलांच्या हत्येशी संबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली, ज्यामध्ये महिलांनी सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. (Hateful act of female police in Pakistan, female prisoner danced naked)

इतर बातम्या

युपीतील महिला बॉक्सरचा सोनीपतमध्ये संशयास्पद मृत्यू

मोठी बातमी! मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद, पत्नी आणि मुलाचाही मृत्यू

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.