बाळाला दूध पाजत असतानाच भरधाव कारने चिरडलं, मुंबईत कुठे घडलं पुन्हा हिट एन्ड रन?

रस्त्यावरील एका महिलेला चिरडून कारचालक पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बोरिवलीतील आर एम भट्ट रोडवर काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे .

बाळाला दूध पाजत असतानाच भरधाव कारने चिरडलं, मुंबईत कुठे घडलं पुन्हा हिट एन्ड रन?
मुंबईत पुन्हा हिट एन्ड रन
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 9:08 PM

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदाह हिट एन्ड रनचा (Hit And run) धक्कादायक प्रकार समोल आला आहे. अपघात एवढा भयानक होता की कुणाच्या डोळ्यात टचकन पाणी आणले. मुंबईतील बोरिवली भागात हा भयानक अपघात (Accident) घडला आहे. रस्त्यावरील एका महिलेला चिरडून कारचालक पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बोरिवलीतील आर एम भट्ट रोडवर काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे . रस्त्याच्या कडेला दिवसभर फुगे विकून रात्री बाळाला दूध पाजताना एका मातेवर काळाने घाला घातला आहे . एका भरधाव कारने नेमकं याचवेळी या मातेला चिरडलं (Borivli Hit And run) आहे. या भयानक प्रकारमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत आधीही असे भयानक प्रकार समोर आले आहेत. अनेकदा मुंबई अशा घटनांनी हादरून गेली आहे.

अपघातात बाळही गंभीर जखमी

या भरधाव कारने फक्त महिलेला चिरडले नाही तर या अपघातात तिचे बाळही गंभीर जखमी झाले आहे. त्यानंतर या बाळाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातात बाळालाही मोठी इजा पोहोचली आहे. हा कारचालक दोघांना चिरडून फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र अद्यापतरी तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. अपघात झाल्यानंतर या कारचालकाने साधं या महिलेला आणि तिच्या बाळाला दवाखान्यात नेणंही गरजेचं समजलं नाही, हा सर्वात मोठा कृरतेचा कळस आहे.

अपघातात चिमुकला गंभीर जखमी

बोरिवलीत कृरतचा कळस

बोरिवली पोलीस या प्रकरणात अधिक तपास करून, लवकरच या कारचालकाचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. मात्र अशा हिट एन्ड रनच्या केसेस आधीही घडल्याने या घटनेने पुन्हा जखमांची आठवण करून दिली आहे. अशा अपघातांना आवर घालण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा भासू लागली आहे. या कारचालकाला पकडून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे.

Pune crime | पुण्यात स्वतःच्या ४ वर्षाच्या बालकाच्या अपहरणाचा बनाव रचत आईनेचे केले हे कृत्य ; 24 तासात पोलिसांनी केला घटनेचा उलगडा

Kalyan Crime : आई आणि मुलीस बेदम मारहाण करुन दागिने, रोकड घेऊन चोरटे पसार, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Pimpri Chinchwad crime | पिंपरीत ‘स्वयंपाक करण्यास का उशीर झाला’ असे विचारत पतीने पत्नीला पेटवले ; वाचा पूर्ण घटना

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.