आधी सोशल मीडियावर मैत्री, भेटून गोड बोलून तरुणाला कपडे काढायला लावले, अश्लील व्हिडीओ बनवला, नंतर ब्लॅकमेल

सोशल मीडियावर कधीकधी आपण मोहामध्ये वाहत जाऊन चुकीच्या किंवा वाईट लोकांच्या जाळ्यातही अडकू शकतो (Honey trap gang of 3 man and 2 woman arrest).

आधी सोशल मीडियावर मैत्री, भेटून गोड बोलून तरुणाला कपडे काढायला लावले, अश्लील व्हिडीओ बनवला, नंतर ब्लॅकमेल
सूनेसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा नको म्हणून बापाने केली मुलाची हत्या
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 4:58 PM

लखनऊ : सोशल मीडियावर आपण अनेक चांगल्या लोकांशी जोडले जातो. या माध्यमातून आपण आपली एक वेगळी ओळख देखील निर्माण करु शकतो. मात्र, सोशल मीडियावर कधीकधी आपण मोहामध्ये वाहत जाऊन चुकीच्या किंवा वाईट लोकांच्या जाळ्यातही अडकू शकतो. कारण या जाळ्यात अडकल्यानंतर खूप मनस्तापाला सामोरे जावे लागते. या जाळ्यात अडकलेले काही लोक तर स्वत:चं आयुष्य संपवायला निघतात. त्यामुळे या भयावर आणि विकृत प्रकाराविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. संबंधित प्रकाराला हनी ट्रॅप असंही म्हणतात. उत्तर प्रदेशचा एक तरुण याच संबंधित जाळ्यात अडकला होता. त्यामुळे तो स्वत:चा जीव संपवण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याला योग्यवेळी साथ दिल्याने तो बचावला (Honey trap gang of 3 man and 2 woman arrest).

आरोपी महिलेने तरुणाला कसं फलवलं?

लखनऊच्या हजरतगंज येथील एका तरुणाची सोशल मीडियावर एका महिलेशी ओळख झाली. तो तिच्याशी चॅट करु लागला. त्याचं महिलेसोबत फोनवर बोलणंचालणं वाढलं. महिलेने त्याला एकदा भेटण्यासाठी बोलवलं. पीडित तरुण एकाठिकाणी तिला भेटण्यासाठी गेला. तिथे महिलेने तरुणाला अश्लील गोष्टी सांगून मोहात पाडलं. त्याचे कपडे उतारले. त्यानंतर अचानक तिथे तीन बनावट पोलीस कर्मचारी आले. त्यांनी धमकी देऊन त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर ते पैशांची मागणी करत पीडित तरुणाला व्हिडीओ व्हायरल करण्याची सारखी धमकी देतात. त्यांच्या धमकी आणि त्रासाला कंटाळून पीडित तरुणाने थेट आत्महत्या करण्याचा विचार केला. मात्र, त्याआधी त्याने पोलिसांकडे जाऊन संबंधित प्रकार सांगितला. त्याने पोलिसांकडे मदतीची मागणी केली.

पोलिसांनी कशी मदत केली?

पोलिसांनी पीडित तरुणाच्या तक्रारीला गांभीर्याने घेतलं. पोलिसांनी याप्रकरणी एक विशेष पथक या प्रकरणाच्या तपासासाठी कामाला लावतं. दरम्यान, आरोपींनी पीडित तरुणाला कानपूर रोड येथे येऊन पैसे देण्यास सांगितलं होतं. पीडित तरुणाने पैसे दिले नाहीत तर त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी त्यांनी दिली. याबाबतची माहिती पीडित तरुणाने पोलिसांना दिली. पोलिसांनी तरुणाला तिथे जाण्यास सांगितलं.

आरोपींनी अनेकांना फसवल्याचं उघड

तरुणापाठोपाठ पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. आरोपी महिला तिच्या चार सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी आली. मात्र, पोलिसांनी जेव्हा तिच्या तीन सहकाऱ्यांना बघितलं तेव्हा धक्काच बसला. कारण त्यांच्यापैकी असलेल्या तीन पुरुष सहकाऱ्यांनी पोलिसांचे कपडे परिधान केले होते. मात्र, ते पोलीस नव्हते. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. यामध्ये दोन महिला तर तीन पुरुष होते. संबंधित आरोपींनी अशाप्रकारे अनेकांना फसवल्याचं आता तपासात समोर आलं आहे (Honey trap gang of 3 man and 2 woman arrest).

हेही वाचा : डॉक्टर नवऱ्याने बायकोला लावला कोट्यवधीचा चुना, कशी केली फसवणूक?; वाचाल तर थक्क व्हाल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.