हॉटेलमध्ये बिल देण्यावरून ग्राहक अन् हॉटेल चालकात तुफान हाणामारी, सीसीटीव्ही व्हायरल

Crime News: बार्शीमधील बिअरबार असलेले हे हॉटेल दिसत आहे. या हॉटेलमध्ये मद्य प्राशन केलेल्या ग्राहकाने बिलासंदर्भात वाद घातला. त्या वादातून हॉटेलच्या मॅनेजरवर बाटली फोडली. हॉटेल मॅनेजर बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु इतर दोघा, तिघांनी त्याला जबर मारहाण सुरु केली.

हॉटेलमध्ये बिल देण्यावरून ग्राहक अन् हॉटेल चालकात तुफान हाणामारी, सीसीटीव्ही व्हायरल
हॉटेलमध्ये मॅनेजरला मारहाण करताना ग्राहक
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 4:28 PM

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील एका व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हॉटेलमध्ये बिल देण्यावरून ग्राहक आणि हॉटेल चालकात तुफान मारहाण झाली आहे. मारहाणीची ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना 23 जुलै रोजी रात्री घडली. बिलावरुन वाद आणि त्यानंतर हाणामारी असा हा प्रकार होता. या प्रकरणात सागर ओहोळ याच्यासह तथागत मस्के, निखिल ननवरे, समर्थ वस्ताद यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

खंडणी मागितल्याचा आरोप

बार्शी शहरातील एका हॉटेलमध्ये बिल देण्यावरून हॉटेल चालकाशी चौघ जणांनी वाद घातला. त्यानंतर त्या हॉटेल चालकास तुफान मारहाण चौघांनी केली. या मारहाणीनंतर चौघांविरोधात बार्शी पोलिसात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ (१), ११५ (२), ३२४ (४), ३०८ (३), ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. हॉटेल चालू ठेवायचा असल्यास वीस हजार रुपये खंडणीचीही मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

काय आहे व्हिडिओमध्ये

बार्शीमधील बिअरबार असलेले हे हॉटेल दिसत आहे. या हॉटेलमध्ये मद्य प्राशन केलेल्या ग्राहकाने बिलासंदर्भात वाद घातला. त्या वादातून हॉटेलच्या मॅनेजरवर बाटली फोडली. हॉटेल मॅनेजर बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु इतर दोघा, तिघांनी त्याला जबर मारहाण सुरु केली. मॅनेजरला दारुच्या बाटल्या फेकून मारत लाथाबुक्यांनी तुडवले. यावेळी हॉटेलमध्ये असणारे काही ग्राहक त्यांना सोडवताना दिसत आहे. या मारहाणीत हॉटेल चालक जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.