पहाटे 3.50 ची वेळ, गोदावरी नदीवरील पाईपला लटकलेल्या अवस्थेत मुलीचा पोलिसांना फोन आणि मग….
पहाटेच्या सुमारास ब्रिजवर नेमकं काय घडलं?. या मुलीने मोठी हिम्मत दाखवली. त्या अवस्थेतही तिने धैर्य सोडलं नाही.
हैदराबाद : पुलावरुन खाली ढकलल्यानंतर एका मुलीने मोठ्या हिंमतीने स्वत:चे प्राण वाचवले. रविवारी पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलावरुन या मुलीला ढकलण्यात आलं. यावेळी मुलीची आई सुहासिनी (36) आणि तिची बहिण जर्सी (1) सोबत होते. पुलावरुन ढकलल्यानंतर ही मुलगी प्लास्टिकच्या पाईपला पकडून राहिली. त्या लटकलेल्या अवस्थेत तिने पोलिसांना 100 नंबरला फोन लावला.
आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडिली. आईच्या लिव्ह इन पार्ट्नरने या मुलीला ब्रिजवरुन ढकलून दिलं होतं.
पुलावरुन ढकलणारा आरोपी कोण होता?
आरोपी उलावा सुरेश हा पीडित मुलीच्या आईचा लिव्ह इन पार्ट्नर आहे. त्याने अल्पवयीन मुलीला गौतमी ब्रिजवरुन ढकलून दिलं. मुलीने खाली पडताना ब्रिजला लागून प्लास्टिकचा पाईप पकडला. मुलीने त्या अवस्थेत स्वत:च्या खिशातून मोबाइल फोन काढला व मदतीसाठी पोलिसांना 100 नबर डायल केला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
पोलीस किती वाजता पोहोचले?
मुलीची आई आणि एकवर्षाची बहिण बेपत्ता आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचे प्राण वाचवले. “रविवारी पहाटे 3.50 च्या सुमारास आमच्याकडे मदत मागणारा फोन आला. आम्ही पहाटे 4 वाजता घटनास्थळी पोहोचलो. ब्रिजला लागून असलेल्या पाईपला मुलगी लटकलेल्या अवस्थेत आम्हाला दिसली” असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी हायवे पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका केली. आरोपीने तिघींना काय सांगून गाडीच्या बाहेर बोलावलं?
“सुरेश माझ्या आईसोबत रहायचा. तो आम्हाला तिघींना घेऊन गेला होता. ब्रिजवर त्याने गाडी थांबवली. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्याने आम्हाला बाहेर बोलावलं. आम्हाला तिघींना त्याने गोदावरी नदीत ढकलून दिलं” असं मुलीने सुटकेनंतर पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मुलीची आई आणि बहिणीच्या शोधसाठी दोन पथक बनवली आहेत. एक पथक बेपत्ता असलेल्या दोघींचा शोध घेईल. दुसरी टीम आरोपी सुरशेच्या अटकेसाठी प्रयत्न करेल.