रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील नरवण आणि बोऱ्या येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 47 हजार 560 रूपये किंमतीचा गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी गोठ्यात आणि नंबरप्लेट नसलेल्या कारमध्ये अवैध दारुचा साठा ठेवला होता (Huge stock of spurious liquor seized from state excise duty in Ratnagiri).
गुहागर तालुक्याती नरवण येथे एकाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा केला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण आणि भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी नरवण येथून गोवा बनावट गोल्डन एम व्होरकीचे 25 बॉक्स, महाराष्ट्र बनावटीच्या मद्याचा 1 बॉक्स, 180 लीटर गावठी दारू आणि 1 नंबरप्लेट नसलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 6 लाख 82 हजार 976 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी आरोपी नितेश दिनेश आरेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश याने गोवा बनावट मद्याचे काही बॉक्स घराजवळ असलेल्या गोठ्यात तर गावठी दारू आणि काही बॉक्स स्विफ्ट डिझायर कारमध्ये ठेवले होते (Huge stock of spurious liquor seized from state excise duty in Ratnagiri).
या कारवाईनंतर उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी बोऱ्या येथे कारवाई करून गोल्डन एस व्हीस्कीचे 2 बॉक्ससह मॅक्डॉल नं 1 व्हिस्की, हायवर्ड्स व्हिस्की, डिएसपी ब्लॅक असा एकूण 64 हजार 584 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुप्रिया संदेश ठाकूर हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित कारवाई निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, किरण पाटील, स.दु.नि विजय हातीसकर, जवान सागर पवार, दत्तप्रसाद कालेलकर, विशाल विचारे, महिला जवान अनिता नागरगोजे यांनी केली. पुढील तपास निरीक्षक शरद जाधव आणि दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत. तसेच अशात पद्धतीने गोवा बनावट आणि गावठी दारू धंद्यावर कारवाया सुरू राहील, असा इशारा प्र.अधिक्षक वैभव वैद्य यांनी दिला.
हेही वाचा : जिममधली ठसन, भर रात्री नांदेडच्या चौकात दोन गट भिडले, प्रचंड नासधूस, लाखोंचं नुकसान, 250 जणांवर गुन्हा