पत्नीसोबतचा वाद विकोपाला, आधी दीड वर्षाच्या चिमुकल्याला गळफास, नंतर बापाची आत्महत्या

पत्नीशी झालेल्या वादातून पतीने दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. (Buldhana Husband Committed Suicide with Child)

पत्नीसोबतचा वाद विकोपाला, आधी दीड वर्षाच्या चिमुकल्याला गळफास, नंतर बापाची आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 10:26 AM

बुलडाणा : पत्नीशी झालेल्या वादातून पतीने दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनेश पुंडलिक वानखडे (26)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Husband Committed Suicide with One and a half Child Due to dispute with wife in Buldhana)

पती-पत्नीच्या वादातून टोकाचे पाऊल

बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कुंदेगाव आहे. या ठिकाणी दिनेश पुंडलिक वानखडे हे राहतात. दिनेश वानख़डे यांचे काल पत्नीशी जोरदार भांडण झाले. यानंतर दिनेश हा दीड वर्षाच्या चिमुकला रोशनला घेऊन कुंदेगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाजवळ आला. त्यानंतर त्याने एका ओढणीच्या मदतीने रोशनला गळफास दिला. त्यानंतर स्वत: दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. पती-पत्नीच्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांचे मृतदेह खाली उतरवले. या प्रकरणी मृताचा भाऊ राजेश वानखडे याने तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन याप्रकरणी अकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

मात्र वडील आणि अवघा दीड वर्षाचा मुलगा झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्यानतंर सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

(husband Committed Suicide with One and a half Child Due to dispute with wife in Buldhana)

संबंधित बातम्या :

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून खेळच संपवला

सोलापुरात राडा, दारूच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

आईच्या प्रियकराचा मुलींवर अनेकदा बलात्कार, दुसरीकडे बाप मुलींना विकायला निघाला, गुंतागुंतीचं किळसवाणं कृत्य अखेर उघड

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.