पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती 13 महिने तुरुंगात, जामिनावर सुटताच शोधून काढलं आणि आता…

पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली तरुगांत १३ महिने त्याला काढावे लागले. पण आता जे सत्य समोर आलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती 13 महिने तुरुंगात, जामिनावर सुटताच शोधून काढलं आणि आता...
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 10:40 PM

आझमगड : कोणासोबत कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कधी कधी तर चुकी नसताना देखील लोकांना एखाद्या गोष्टीचा भूर्दंड बसतो. अशीच एक घटना घडलीये उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यात. ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीला 13 महिने तुरुंगात काढावे लागले. तीच पत्नी आता जिवंत सापडली आहे. तुरुंगातून जामिनावर सुटताच पतीने पत्नीचा शोध सुरु केला आणि तिला शोधून काढलंच. आता मात्र पत्नीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

मसोना सुखपूर गावात राहणारा दिपू याचा विवाह रुची सोबत झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये काही जमलं नाही. सतत वाद होत होते. त्यामुळे पत्नी घर सोडून निघून गेली. त्यानंतर ती मामाकडे राहत होती. पण पंचायतने तिला नांदण्यासाठी आग्रह केला. ती पुन्हा एकदा सासरी परतली.

सासरच्या घरी आलेली रुची आठवडाभर अचानक गायब झाली. दीपू आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला पण काहीही माहिती मिळत नव्हती. आता मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात दिपू आणि त्याचा कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर दीपूला पोलिसांनी अटक केली.

आता सत्य समोर आल्यानंतर पत्नी रुचीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित दीपू म्हणतो की, मी 13 महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पत्नीचा शोध सुरू केला. त्यानंतर ती भिंड जिल्ह्यातील जियानपूर येथे आढळली. यानंतर रुची आणि तिचे मामा आणि तिच्या बहिणीविरुद्ध तपास सुरु आहे.

पीडित दीपुच्या नातेवाईकांनी सांगितले की, आपण निर्दोष आहोत, असे वारंवार सांगत होतो. तरी देखील ३ दिवस आम्हाला पोलीस ठाण्यात बसवण्यात आले. आमचे ऐकले जात नव्हते. घरची परिस्थिती दयनीय झाली होती. जमीन विकावी लागली, तो आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उसाचा गाडा चालवून आपला उदरनिर्वाह करतो आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.