संशयाची सुई मनात घुसली, मग जे घडलं त्याने तीन आयुष्य बरबाद झाली !

पतीच्या मनात सुंशयाची सुई घुसली. या संशयातून पतीने भयंकर पाऊल उचलले. यामुळे दोन कुटुंब उद्धवस्त झाली आहेत.

संशयाची सुई मनात घुसली, मग जे घडलं त्याने तीन आयुष्य बरबाद झाली !
अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीसह शेजाऱ्याला संपवले
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 12:38 PM

दिल्ली : राजधानीत हत्येच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. एका महिलेच्या मृतेदहाचे तुकडे सापडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा डबल मर्डरने दिल्ली हादरली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीसह शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना दिल्लीतील साऊथ दिल्लीत घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. इमरान असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. रोज काही ना काही कारणातून दिल्लीत भयंकर गुन्हे घडत आहेत.

काय आहे प्रकरण?

आपल्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या संजीतोसबत अनैतिक संबंध सुरु असल्याचा पतीला संशय होता. याच संशयातून त्याने टोकाचे पाऊल उचलत पत्नी आणि शेजाऱ्याचा काटा काढला. इमरानने संजीतवर चाकूने हल्ला केला. यानंतर संजीतचे कुटुंबीय त्याला तात्काळ बीएसए रुग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर पत्नीलाही गळा दाबून संपवले.

आरोपीने हत्या केल्यानंतर पोलिसांना पीसीआर कॉल करुन पत्नीची हत्या केल्याचे सांगितलेय यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहिले असता पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. पोलिसांनी तिला तात्काळ बीएसए रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी आरोपीने पत्नीसह तिच्या प्रियकराची आपण हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

हे सुद्धा वाचा

यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी करत आहेत. दोघा मयतांमध्ये खरंच अनैतिक संबंध होते का याबाबतही पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे दोघा मयतांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.