धक्कादायक! बहिणीच्या घरी जाण्याचा हट्ट जीवावर बेतला; पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

उत्तर प्रदेशच्या इटावामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. रजनीश असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

धक्कादायक! बहिणीच्या घरी जाण्याचा हट्ट जीवावर बेतला; पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या
व्हॉट्सअपवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकली, मग विष प्राशन करुन आत्महत्या
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 7:38 AM

इटावा : उत्तर प्रदेशच्या इटावामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. रजनीश असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. या दाम्पत्याला एक दीड वर्षाचा मुलगा देखील आहे. रजनीश हा शेती व्यवसाय करत होता. शेतीसाठी त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते. कर्ज कसे फेडायचे या चिंतेत तो होता. मात्र रजनीश हा व्यसनांच्या आहारी गेला होता, असा आरोप त्याच्या सासू-सासऱ्यांनी केला आहे.

बहिणीच्या घरी जाण्यावरून वाद

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री रजनीशची पत्नी कांचन हीने आपल्याला बहिणीच्या घरी जायचे आहे, असा हटट् पतीकडे धरला. मात्र रजनीशने आपल्या पत्नीला बहिणीकडे जाऊ नको असे सांगितले. त्यानंतर तो आपल्या मुलाला घेऊन, घरातून बाहेर पडला. जेव्हा तो रात्री घरी आला तेव्हा पुन्हा त्याच्या पत्नीने आपल्याला बहिणीकडे जायचे आहे, असे त्याला सांगितले. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. राग अनावर झाल्याने त्याने पत्नीची हत्या केली, व स्वत: विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

पतीचा उपचारादरम्यान मृत्यू

घटनेबाबत बोलताना रजनीशचा मोठा भाऊ अवनिश याने सांगितले की, जेव्हा रात्री ते रजनीशच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. तर रजनीशची प्रकृती अत्यावस्थ होती. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.

संबंधित बातम्या

Uttar Pradesh : जमिनीच्या वादातून तरुणाकडून भाला मारुन चुलत भावाची हत्या, हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Uttar Pradesh: मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या

Barabanki: गरम पाण्यावरून झालेल्या क्षुल्लक भांडणातून 16 वर्षांचा संसार संपुष्टात, पतीकडून पतीला तिहेरी तलाक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.