पत्नी जास्त बोलते, पतीला इतका राग आला की थेट गळा दाबून खून
Satara Crime news: कराड तालुक्यातील विंग येथे बायको जास्त बोलत असल्याने नवऱ्याने गळा दाबून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मयुरी कणसे असे (वय 27) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पत्नीचा खून करणाऱ्या पती मयूर यशवंत कणसे याला कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Crime News: पती आणि पत्नीचे नाते हे सात जन्माचे असते. पती-पत्नीच्या लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात. आयुष्यात शेवटपर्यंत ही दोन्ही नाती एकमेकांना साथ देत असतात. त्यामुळे या नात्यांमध्ये भांडण अन् प्रेम सुरुच असते. संसाराचा गाडा असाच त्यांचा पुढे जात असतो. परंतु किरकोळ कारणावरुन पत्नीचा खून करणारा पती असू शकतो का? पत्नी जास्त बोलते म्हणून त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली.
जास्त बोलते म्हणून खून
कराड तालुक्यातील विंग येथे बायको जास्त बोलत असल्याने नवऱ्याने गळा दाबून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मयुरी कणसे असे (वय 27) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पत्नीचा खून करणाऱ्या पती मयूर यशवंत कणसे याला कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घरातील लोकांसोबत होत होते भांडण
या प्रकरणात विशाल सदाशिव कणसे याने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मयूर कणसे याचे मयुरी यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. लग्नाच्या वर्षभरात त्यांचामध्ये वाद सुरु झाला. मयुरी हिचे मयूर याच्या कुटुंबातील लोकसोबत जमत नव्हते. त्यांच्याशी तिचे भांडण होत होते. त्यामुळे ती नवऱ्याला सोडून माहेरु निघून गेली.
गळा दाबून केली हत्या
मयूर याने मयुरीची समजूत घालत चार महिन्यापूर्वी तिला घेऊन आला. दोन्ही नवरा-बायको येथे भाड्याच्या घरात राहू लागले. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु होता. बुधवारी मध्यरात्रीही त्यांच्यात वाद झाला. त्या वादात मयूर याने मयुरीला रागात मारले. त्यानंतर तिचा गळा आवळला. त्यामुळे मयुरीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मयूरने मयुरी जास्त बोलते म्हणून तिची हत्या केल्याचे विशाल कणसे यांना सांगितली. त्यानंतर विशालने पोलिसात फिर्याद दिली.
दरम्यान, मयुरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. कराड तालुका पोलीस पुढील तपास करत आहे