Kolkata Extra Marital Affairs: कोलकात्यात विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून अल्पवयीन मुलासमोर पतीकडून पत्नीची हत्या

प्रियंका हलदर असे मयत पत्नीचे नाव असून रुबेल हलदर असे आरोपी पतीचे नाव आहे. हलदर कुटुंब न्यूटाऊन पोलीस स्टेशन हद्दीतील शुलंगुडी साउथ पारा येथे राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा पतीला संशय होता. त्यामुळे तो सतत तणावात असायचा.

Kolkata Extra Marital Affairs: कोलकात्यात विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून अल्पवयीन मुलासमोर पतीकडून पत्नीची हत्या
कोलकात्यात विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून अल्पवयीन मुलासमोर पतीकडून पत्नीची हत्या
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 11:08 PM

कोलकाता : विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपावरून पतीने पत्नीची अल्पवयीन मुलासमोरच काठीने आणि नंतर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील न्यूटाऊन भागातील शुलंगुडी दक्षिण पारा भागात गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. या संपूर्ण घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून पतीला न्यायालयात हजर करण्यात येत आहे. तसेच, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

प्रियंका हलदर असे मयत पत्नीचे नाव असून रुबेल हलदर असे आरोपी पतीचे नाव आहे. हलदर कुटुंब न्यूटाऊन पोलीस स्टेशन हद्दीतील शुलंगुडी साउथ पारा येथे राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा पतीला संशय होता. त्यामुळे तो सतत तणावात असायचा. तर प्रियंका आपल्या मुलासह वडिलांच्या घरी राहत होती. गुरुवारी सकाळी प्रियंका अचानक सासरच्या घरी आली. तिच्यासोबत तिचा मुलगाही होता.

रस्त्यातच पती-पत्नीमध्ये जोरदार वादावादी

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तिने घराच्या दरवाजाला कुलूप पाहिले तेव्हा तिने ते तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पत्नी आल्याची बातमी समजताच पती आपल्या ऑफिसमधून घरी आला आणि वाटेतच त्यांच्यात वादावादी सुरु झाली. त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. पत्नीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता लाकूड व्यापारी पतीने तिला काठीने मारहाण केली. यानंतर पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. आईला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून अल्पवयीन मुलाने घाबरून आरडाओरडा सुरू केला. त्याने पळून जाऊन आपल्या मावशीला याची माहिती दिली. मावशी धावत आली असता तिने नाल्याजवळ प्रियांकाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिली. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत विधाननगर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पती रुबेल हलदरला अटक केली आहे.

पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबेल आणि प्रियांकाचा विवाह 13-14 वर्षांपूर्वी झाला होता. पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय होता. यावरून अनेकदा वादही झाले. या भांडणानंतर प्रियंका आपल्या मुलासह वडिलांच्या घरी राहायला गेली. लाकूड व्यापारी पती त्याच्या वडिलोपार्जित घरात राहत होता, परंतु नंतर त्यांच्यात सतत वाद होत होते. गुरुवारी या भांडणाने हत्येचे रूप धारण केले. (Husband kills wife in front of minor child on suspicion of extramarital affair in Kolkata)

इतर बातम्या

VIDEO | गुजरातमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस टोल प्लाझामध्ये घुसली; अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

वडील रिक्षा चालवता चालवता गेले, मामानं कष्टानं डॉक्टर बनवलं, अशोक पालच्या हत्येनं महाराष्ट्रला हुरहुर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.