नवऱ्याने सकाळी 7.30 वाजता पत्नीला विरारच्या रेल्वे ब्रिजवर गाठलं आणि… अंगावर शहारे आणणारी घटना
Virar Crime : विरार फलाट क्रमांक एकच्या ब्रिजवर सकाळी 7:30 वाजता ही घटना घडली आहे. पत्नी यावेळी कामावर निघाली होती. मागच्या महिन्यात वसईमध्ये सुद्धा भरदिवसा अशीच धक्कादायक घटना घडली.
काही दिवसांपूर्वी वसईत भरदिवसा प्रियकरान प्रेयसीची डोक्यात पान्ह्याचे घाव घालून हत्या केली होती. असाच धक्कादायक प्रकार विरार रेल्वे स्थानकात घडला आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गळ्यावर, हातावर चाकूने वार करून, ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विरार फलाट क्रमांक एकच्या ब्रिजवर सकाळी कामावर जाताना 7:30 वाजता ही घटना घडली आहे. घरातील कौटुंबिक वादातून हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवा शर्मा असे आरोपीचे नाव असून, वीरशिला शर्मा असे जखमी पत्नीचे नाव आहे. आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
विरारमध्ये आरती यादव प्रकरणाची पुनरावृत्ती
कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी काल पती-पत्नी विरार पोलीस ठाण्यात गेले होते. दोघांना समजावून सोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विरारमध्ये आरती यादव प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती दिसून आली. काही दिवसांपूर्वी वसईत भररस्त्यात अशाच प्रकारने एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून, गळा आवळण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी 7:30 वाजता विरार रेल्वे स्थानक फलाट क्रमांक एकच्या ब्रिजवरील घटना घडली.