डेहराडून | 18 ऑगस्ट 2023 : पती पत्नीचं नातं हे विश्वासाचं नातं असतं. विश्वासाच्या या नात्याला तडा गेल्यास संपूर्ण संसाराची वाट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या नात्याला जपणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यात अनेकजण यशस्वी होतात. यशस्वी होण्याचं हे प्रमाण कैकपटीने अधिक आहे. पण नात्यात अविश्वास वाढण्याची वाढणारी संख्याही चिंताजनक आहे. उत्तराखंडच्या हल्दानी येथेही असाच एक विश्वासाच्या नात्याला तडा गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत.
एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर संशय घेतला. पत्नी कुणासोबत तरी खोलीत आहे असं वाटल्यामुळे त्याने बाहेरून दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने पोलिसांना बोलावलं. पोलीसही तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी दरवाजा उघडला. तर आतमध्ये कोणीच नव्हतं. या महिलेशिवाय त्या बंद खोलीत कोणीच नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही पती-पत्नींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. त्यानंतर दोघांचेही कबुली जबाब नोंदवून घेतले.
हल्दानी मेडिकल पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. नवऱ्याने पोलिसांना फोन केला. पत्नी कुणासोबत तरी खोलीत आहे. मी बाहेरून दरवाजा बंद केला आहे. तिला रंगेहाथ पकडायचं आहे. तुम्ही लवकर या, असं त्याने पोलिसांना सांगितलं. तसेच जो व्यक्ती आतमध्ये आहे, तो पोलीस आहे. वर्दीतच तो आत आहे, असंही त्याने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलीस अधिकच सतर्क झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडला. तर आत कोणीच नव्हतं. फक्त त्याची पत्नी होती. तिच्याशिवाय त्या बंद खोलीत कोणीच नव्हतं. त्यामुळे हा नवऱ्याची पोलखोल झाली. तो उगाचच पत्नीवर संशय घेत असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्याने पुन्हा नवा बहाणा बनवला. पोलीस येण्याच्या आधीच पत्नीने कुलूप उघडून त्या व्यक्तीला पळवून लावल्याचा दावा त्याने केला. आपलं म्हणणं खरं आहे हे सांगण्यासाठी त्याने आकांडतांडवही केलं. त्यामुळे पोलीस चांगलेच हैराण झाले.
आम्ही जेव्हा घरी गेलो तेव्हा घरात त्याच्या पत्नीशिवाय कोणीच नव्हतं, असं पोलिसांनी सांगितलं. तूर्तास पोलिसांनी या दोघांना न्यायदंडाधिकाऱ्यासमोर उभं केलं. त्यानंतर दोघांचे कबुली जवाब नोंदवून घेतले. सध्या प्रकरण निवळलं आहे. पोलिसांनी कुणाही विरोधात एफआयआर दाखल केलेली नाही. या प्रकरणी लेखी तक्रार मिळाली तर आम्ही पुढील तपास करू, असं पोलिसांनी सांगितलं.