चारित्र्यावर संशय, पत्नीचं गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवलं, ‘सर्किट’ पतीच्या विकृतीचा कळस
समाजात पत्नीला आपली मालकी समजण्याची मानसिकता कधीकधी इतकी विकृतीपर्यंत जाते की केवळ संशयावरुन महिलांवर अत्याचार होतो. मध्य प्रदेशमधील सिंगरोली जिल्ह्यात असाच प्रकार समोर आलाय. येथे पतीने संशयातून विकृतीचा कळस गाठत थेट पत्नीचे गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवले.
![चारित्र्यावर संशय, पत्नीचं गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवलं, 'सर्किट' पतीच्या विकृतीचा कळस चारित्र्यावर संशय, पत्नीचं गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवलं, 'सर्किट' पतीच्या विकृतीचा कळस](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/03/03215931/Sexual-Abuse.jpg?w=1280)
भोपाळ : समाजात पत्नीला आपली मालकी समजण्याची मानसिकता कधीकधी इतकी विकृतीपर्यंत जाते की केवळ संशयावरुन महिलांवर अत्याचार होतो. मध्य प्रदेशमधील सिंगरोली जिल्ह्यात असाच प्रकार समोर आलाय. सिंगरोलीतील माडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी पतीने पत्नीवर इतर पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. तसेच याच संशयातून त्याने विकृतीचा कळस गाठत थेट पत्नीचे गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवले. यामुळे प्रचंड प्रमाणात शारीरिक आणि मानसिक त्रास सहन कराव्या लागलेल्या पत्नीने अखेर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.
संशयाचा कळस, पतीने पत्नीचे गुप्तांग सुई-दोऱ्यानं शिवले
पीडित महिलेचा पती तिच्यावर कायमच चारित्र्यावरुन संशय घेत होता. तुझे इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध आहेत, असा आरोप पतीकडून केला जात होता. मात्र, आता त्याच्या या संशयाचा कळस झाला आणि आरोपीने थेट गुप्तांग सुई-दोऱ्यानं शिवण्याचा किळसवाणा प्रकार केला. आरोपी पतीच्या या कृत्यानंतर अखेर पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली, अशी माहिती सिंगरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी दिली.
आरोपी पतीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
पीडितीने दिलेल्या माहितीनुसार, “संशयाने पतीला आंधळं केलं होतं. याच संशयातून त्याने आपल्या मर्यादा ओलांडत सुई-दोऱ्यानं गुप्तांग शिवलं.” पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी पतीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. हे कृत्य अत्यंत निर्दयी , अमानवीय आणि पीडितेला भयंकर त्रास देणारं आहे, असं मत पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केलंय. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय.
पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करुन घेतली आहे. या अहवालानंतरच आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी पती फरार असून पोलीस त्याच्या शोधासाठी छापेमारी करत आहेत.
हेही वाचा :
फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन मित्रांकडूनच गँगरेप, अश्लील व्हिडीओ बनवल्याचाही दावा
बीडमध्ये 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी
अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढत बलात्कार, पाकिस्तानात माणुसकीला लाजवणारी घटना
व्हिडीओ पाहा :
Husband sewing private parts of wife with needle due to character suspicion in Singrauli MP