Love Affairs | बायकोला नको त्या अवस्थेत पाहिलं, मग नवऱ्याने पत्नीच्या मनासारखा घेतला निर्णय
Love Affairs | अजय कुमारच (24) 2018 साली काजल (22) बरोबर लग्न झालं. या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे. असा निर्णय घेणं अजिबात सोप नाही. कारण पदरात दोन मुलं आहेत. पण अजय कुमारने थेट असा निर्णय घेऊन सगळ्यांनाच धक्का दिला.
बेगुसराय : प्रेम म्हणजे त्याग. प्रेमात पडल्यानंतर तुमच्यात त्यागाची भावना असेल, तर ते खर प्रेम आहे असं म्हणतात. लग्नानंतर वैवाहिक आयुष्यात संसार करताना काही तडजोडी, त्याग करावे लागतात. पण लग्नानंतर आपल्या जोडीदाराचा हात दुसऱ्याच्या हातात देणं हा किती मोठा त्याग आहे?. एका माणसाने त्याच्या पत्नीच तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतलाय. महत्वाच म्हणजे या जोडप्याला दोन मुलं आहेत. पत्नीच तिच्या प्रियकराशी लग्न लावून देताना पदरात असलेल्या दोन मुलांची जबाबदारी नवरा घेणार आहे. प्रियकरासोबत संसार करताना तिला कुठलं ओझ वाटू नये, यासाठी त्याने हा निर्णय घेतलाय. बिहारच्या बेगुसरायमधल हे प्रकरण आहे.
अजय कुमारच (24) 2018 साली काजल (22) बरोबर लग्न झालं. लग्नानंतरही काजल राजकुमार ठाकूरच्या संपर्कात होती. लग्नाच्या आधीपासून काजलचे राज कुमार ठाकूर बरोबर प्रेमसंबंध होते. काजलच लग्न झालं. तिला दोन मुलं झाली. त्यानंतरही तिच राजकुमार ठाकूर बरोबर प्रेमसंबंध कायम होते. दोघे चोरुन भेटायचे. राजकुमार बरोबर मी माझे संबंध तोडणार नाही, असं काजलने मंगळवारी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. अजयच्या कुटुंबीयांनी काजल आणि राज कुमारला नको त्या अवस्थेत पकडलं, त्यानंतर अजयला या प्रेमसंबंधाबद्दल समजलं.
‘संतापातून तिला वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं’
“या घटनेबद्दल मला माझ्या कुटुंबीयांनी सांगितलं, तेव्हा मला धक्का बसला. पण मी तिला माझ्यासोबतच्या लग्नाच्या बंधनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. राजकुमार सोबत तिचे संबंध असताना लग्न कायम ठेवणं मला पटलं नाही. गावाच्या मंदिरात मी दोघांच्या लग्नाची व्यवस्था केली. माझे कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या संतापातून तिला वाचवण्यासाठी मी हे पाऊल उचललं” असं अजय कुमारने सांगितलं. “काजलच राजकुमारशी लग्न लावून देणं हा त्यांच्या कुटुंबाचा अंतर्गत विषय आहे. गावकऱ्यांनी सुद्धा हा निर्णय मान्य केलाय” असं गावाच्या सरपंचांनी सांगितलं.