CCTV VIDEO | वडिलांना हलगर्जी भोवली, कारच्या चाकाखाली चिरडल्याने पोटच्या मुलाचा मृत्यू

वडिलांनी गाडी सुरु केल्यानंतर काही समजण्याच्या आतच चार वर्षांचा सात्विक गाडीच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला. काही सेकंदांनंतर, जेव्हा बापाला काय घडले ते समजले, तेव्हा तो घाबरून कार थांबवून बाहेर आला आणि सात्विकला हातात उचलून अपार्टमेंटमध्ये जाताना दिसला.

CCTV VIDEO | वडिलांना हलगर्जी भोवली, कारच्या चाकाखाली चिरडल्याने पोटच्या मुलाचा मृत्यू
कारखाली चिरडून चिमुरड्याचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 1:51 PM

हैदराबाद : कारच्या चाकाखाली चिरडून एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या नजरचुकीमुळेच चार वर्षांच्या सात्विकचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे. रविवारी 21 नोव्हेंबर रोजी हैदराबादच्या एलबी नगरमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये अपार्टमेंटच्या बाहेरच्या गल्लीत एक एसयूव्ही कार पार्क केलेली दिसत आहे. सुरक्षा रक्षक लक्ष्मण कारच्या दिशेने जाऊन आत बसला. काही सेकंदांनंतर त्याचा चिमुकला मुलगा सात्विक दुसर्‍या मुलासोबत खेळण्यासाठी गेटबाहेर घाईघाईने जात होता.

इतक्यात गाडी सुरु झाली असतानाही सात्विक तसाच समोर उभा राहिला. काही समजण्याच्या आतच सात्विक गाडीच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला. काही सेकंदांनंतर, जेव्हा लक्ष्मणला काय घडले ते समजले, तेव्हा तो घाबरून कार थांबवून बाहेर आला आणि सात्विकला हातात उचलून अपार्टमेंटमध्ये जाताना दिसला.

जखमी मुलाचा मृत्यू

गंभीर जखमी झालेल्या सात्विकला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा तपास एलबी नगर पोलीस करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, याआधी ऑगस्ट महिन्यात हैदराबादच्या मियापूरमध्ये राहणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाचा अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने मृत्यू झाला होता. सुकेंदर नावाचा मुलगा खेळत असताना चुकून बाल्कनीतून घसरला आणि पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले होते. सुकेंदर हा मियापूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाचा मुलगा होता. संबंधित बातम्या :

पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नाशिकच्या तरुणाचा आयुष्याला पूर्णविराम

एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास, प्रेयसीच्या शेतात प्रेमी युगुलाचा करुण अंत

मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 10 लाख बिटकॉईनमध्ये बुडाले, वसईतील व्यापाऱ्याचा लुटीचा बनाव

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.