बापरे! नोटांच्या बंडलच बंडल, प्राध्यापकाच्या गाडीत लाखोंची रोकड, नेमकं प्रकरण काय?

प्राध्यापकाकडे इतकी रक्कम नेमकी कशी आली याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांना खरंतर संबंधित रक्कम ही 'हवाला' मार्गातून आल्याचा संशय आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

बापरे! नोटांच्या बंडलच बंडल, प्राध्यापकाच्या गाडीत लाखोंची रोकड, नेमकं प्रकरण काय?
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 10:05 PM

हैदराबाद : पोलिसांना एका प्राध्यापकाकडे तब्बल 70 लाखांची रोकड सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही हैदराबादमधील पंजागुट्टा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिसांकडून वाहनांची झडती सुरु होती. या दरम्यान पोलिसांना एका ब्रिझा कारमध्ये पिशवीत तब्बल 70 लाखांची रोकड सापडली. गाडीत नोटांचे बंडल पाहून पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी गाडीत असलेल्या दोघांची चौकशी केली. पण त्यांची उत्तरं पोलिसांना संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता आरोपींपैकी एकजण हा सहायक प्राध्यापक असल्याची माहिती समोर आली.

प्राध्यापकाकडे इतकी रक्कम नेमकी कशी आली याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांना खरंतर संबंधित रक्कम ही ‘हवाला’ मार्गातून आल्याचा संशय आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

खरंतर आरोपी हे सहजासहज पकडले गेले नसते. पण स्थानिक पोलीस हे 27 ऑक्टोबरला द्वारकापुरी कॉलनी परिसरात नाकाबंदी दरम्यान रुटीन वाहन चेक करत होते. या दरम्यान एका ब्रिझा कारमध्ये पोलिसांना नोटांनी भरलेली पिशवी आढळली.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना चेकींग दरम्यान संशय आलाच होता. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि सिव्हील पोलिसांनी कारला रोखलं होतं. तिची झडती घेतली असता गाडीमध्ये पिशव्यांमध्ये लाखो रुपये असल्याचा संशय पोलिसांना आला.

पोलिसांनी गाडीत असलेल्या दोघांना पैशांबद्दल विचारलं तेव्हा त्यांना योग्य उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. किशव राव आणि वेमुला वामशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी किशन राव हा हुजूराबादचा रहिवासी आहे. तो एका कॉलेजमध्ये कॉमर्स विभागात असिस्टंट प्रोफेसर आहे. आरोपी प्राध्यापकाने याआधी एबीवीपी एबिड्स झोन प्रभारी म्हणून काम केलेलं आहे.

पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता आरोपींना मधू नावाच्या व्यक्तीकडून पैसे सोपवण्यात आले होते. संबंधित पैसे हे नेमके कुणाचे होते आणि ते पैसे कुणाकडून कुणाला देण्यात येणार होते याबाबतची माहिती पोलीस काढत आहेत. त्यामुळे पैसे नेमके कुणाचे आहेत ते पोलीस या घडीला तरी सांगू शकत नाहीयत. पोलीस सध्या तरी फरार आरोपी मधूच्या शोधात आहेत.

आपण अनेकदा हवाला मार्गाने पैशांची अफरातफर केली जात असल्याचं ऐकलं आहे. पण अनेकांना हवाला म्हणजे नेमकं काय हे माहिती नसतं.

हवाला म्हणजे रोख रक्कम ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे. पण पैसे नेमके कुणाचे आहेत. तसेच पैसे कुणी पाठवले आहेत आणि पुढे कुठे जाईल याबाबत पैसे इकडून तिकडे घेऊन जाणाऱ्याला काहीच माहिती नसते.

या मार्गाने जगभरातून पैशांची देवाणघेवाण केली जाते. पण या काळ्या धंद्याची साखळी पकडणं खूप कठीण असतं. मध्यस्थींना फक्त पैसे कुणाकडून घेतले आणि कुणाला द्यायचे एवढंच माहिती असतं. ते पैसे कुठे जाणार याची देखील त्यांना माहिती नसते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.