सेलिब्रेशनसाठी बालमित्राला बोलावलं; पण त्याने सॉफ्टवेअर इंजीनिअर तरुणीसोबत नको ते केलं
एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला तिच्या बालपणीच्या मित्रानेच दगा दिला. नवीन नोकरी लागल्याचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून तिने त्याला हॉटेलमध्ये बोलावलं होतं. काय घडलं तिथे?
एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली. तिच्यावर दोघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. यामध्ये एक तिचा बलापणीचा मित्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमावारी रात्री ही घटना घडली. पीडित तरुणीला नुकतीच सॉफ्टवेअर इंजिनिअरींग क्षेत्रात नोकरी लागली होती. वनस्थालीपूरमध्ये येथे तिने तिच्या नवऱ्या नोकरीचा आनंद साजरा करण्यासाठी बालपणीच्या मित्राला बोलावलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.
रेस्टॉरंटच्या आवारात असलेल्या हॉटेल रुममध्ये जाण्याआधी मी आणि माझ्या मैत्रिणीने मद्यपान केलं, असं पीडित तरुणीने पोलिसांना सांगितलं. मद्याच्या अमलाखाली असताना पार्टीला बोलावलेल्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्राच्या चुलत भावानेदेखील हॉटेल रुममध्ये जाऊन लैंगिक शोषण केलं, असं पोलीस रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हैदराबाद येथे ही घटना घडली आहे.
पोलिसांनी तिला रुग्णालयात नेलं
गुन्हा केल्यानंतर दोन्ही आरोपी तिथून निघून गेले. पीडित तरुणीने तिच्या भावाशी संपर्क साधला व त्याला सगळं सांगितलं. पोलिसांनी महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावर तक्रार नोंदवली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात नेलं.