IAS अधिकारी अन् माजी आमदाराने रेप केसमधून वाचण्यासाठी महिलेस दिले ९० लाख अन्…महिलेच्या आरोपानंतर सुरु झाले वादळ
महिला एक वेळा गर्भवती झाली. त्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. परंतु दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यावर तिने 2018 मध्ये एका मुलास जन्म दिला. हा मुलगा संजीव हंस याचा असल्याचा दावा महिलेने करत डीएनए चाचणीची मागणी केली आहे.
देशात बनावट दाखले देऊन आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांची काही प्रकरणे सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचवेळी एका आयएएस अधिकारी आणि माजी आमदारावर मोठा आरोप झाला आहे. आयएएस अधिकारी आणि बिहार सरकारमधील ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव संजीव हंस आणि माजी आमदार गुलाब यादव यांच्यावर हे आरोप झाले आहे. त्यानंतर आता या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) एन्ट्री झाली आहे. महिला वकिलाला गप्प करण्यासाठी या दोघांनी 90 लाख रुपये तिच्या खात्यात हस्तांतरित केले होते. त्यांचे खाते आणि 20 लाख रुपये किमतीची कारही दिली. परंतु, महिलेने आपल्या मुलाला वडिलांचे नाव देण्यासाठी दोघांच्या विरोधात मोर्चा उघला. पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर 90 लाख रुपये प्रकरणात ईडीने मन लॅण्डिंग कायद्याच्या कक्षेत या दोघांच्या चार ठिकाणी छापे टाकले. आता छाप्यात सापडलेली कागदपत्रे आणि व्यवहारांची तपासणी ईडी करत आहे.
ईडीने नोंदवला जबाब
ईडीने या प्रकरणात महिला वकिलाचा जबाब नोंदवला आहे. त्या महिला वकिलाने संजीव हंस आणि गुलाब यादव यांच्यावर अत्याचार, प्रलोभन देणे, फसवणूक करणे असे आरोप केले आहेत. ही महिला वकील बिहारमधील असून अहलाबाद (प्रयागराज) उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करते. हे प्रकरण मिटवण्यासाठी संजीव हंस आणि गुलाब यादव यांनी तिच्या खात्यात 90 लाख रुपये ट्रन्सफर केले तसेच 20 लाख रुपयांची गाडी दिली.
कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल
महिला वकिलाने 2021 मध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस एफआयआर नोंदवून संजीव हंस आणि गुलाब यादव यांची चौकशी करत आहेत. या महिलेच्या आरोपनुसार, 2016 मध्ये आमदार असलेल्या गुलाब यादव याने तिला बिहार राज्य महिला आयोगाची सदस्य बनवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर 2016 ते 2019 या काळात गुलाब यादव आणि संजीव हंस यांनी दिल्ली आणि पुणे येथील अनेक हॉटेलमध्ये महिला वकिलासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
महिलेने दिला मुलास जन्म
महिला एक वेळा गर्भवती झाली. त्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. परंतु दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यावर तिने 2018 मध्ये एका मुलास जन्म दिला. हा मुलगा संजीव हंस याचा असल्याचा दावा महिलेने करत डीएनए चाचणीची मागणी केली आहे.