IAS अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू की हत्या? कार्तिकच्या नातेवाईकांनी केला धक्कादायक खुलासा!
व्हिजिलन्स डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, जे आरोप केले जात आहेत ते सर्व खोटे आणि बिनबुडाचे आहेत. कार्तिकच्या आत्महत्येचे आम्हालाही दु:ख असल्याचेही ते म्हणाले आहेत. डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, संजय पोपलीच्या घरातून मोठ्या प्रमाणात रिकव्हरी करण्यात आली आहे. संजय पोपली यांच्या घरावर छापे टाकून घरातील स्टोअररूममध्ये लपवून ठेवलेले सोने, चांदी आणि मोबाईल जप्त केले.
चंदीगडमध्ये (Chandigarh) आयएएस अधिकारी संजय पोपली यांच्या मुलाच्या मृत्यूचे गूड वाढतांना दिसते आहे. संजय आणि त्यांची पत्नी आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे पंजाब व्हिजिलन्स टीमने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. कार्तिकच्या आत्महत्येशी (Suicide) आमचा काहीही संबंध नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. चंदीगड येथून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात व्हिजिलन्स पथकाने आयएएस अधिकारी संजय पोपली यांना चंदीगड येथून अटक केली होती. आयएएस अधिकारी संजय पोपली यांच्या घरावर व्हिजिलन्सच्या छापेमारीत त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र, कार्तिक पोपली यांच्या आत्महत्येशी आमचा काहीही संबंध नसल्याचे व्हिजिलन्स विभागाच्या (Vigilance department) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
व्हिजिलन्स डीएसपी अजय कुमार म्हणाले की…
व्हिजिलन्स डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, जे आरोप केले जात आहेत ते सर्व खोटे आणि बिनबुडाचे आहेत. कार्तिकच्या आत्महत्येचे आम्हालाही दु:ख आहे. डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, संजय पोपलीच्या घरातून मोठ्या प्रमाणात रिकव्हरी करण्यात आली आहे. संजय पोपली यांच्या घरावर छापे टाकून घरातील स्टोअररूममध्ये लपवून ठेवलेले सोने, चांदी आणि मोबाईल जप्त केले. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 12 किलो सोन्याचा समावेश असून त्यात 9 सोन्याच्या विटा, 49 सोन्याची बिस्किटे आणि 12 सोन्याची नाणी आहेत, तर 3 किलो चांदीमध्ये 3 चांदीच्या विटा आणि 18 चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. याशिवाय चार नवीन आयफोन, सॅमसंग कोल्ड फोन देखील आहेत.
IAS अधिकारी संजय पोपली यांचा गंभीर आरोप
IAS अधिकारी संजय यांनी व्हिजिलन्स पथकावर आरोप केला आहे की, अधिकाऱ्यांनीच माझ्या मुलाची हत्या केली आहे. याचा मी साक्षीदार आहे. त्याचवेळी कार्तिक पोपलीच्या आईने सांगितले की, त्यांनी माझ्या मुलाचा छळ केला आणि त्याची हत्या केली. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली व्हिजिलन्स ब्युरो आणि डीएसपी लोकांची हत्या करत आहेत.कार्तिक पोपलीची हत्या केल्याचा आरोप संजय पोपली यांच्या नातेवाईक अनु प्रीत कुलार यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, पथकाने संजय पोपली यांना काहीतरी सही करण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर ते त्यांच्या मुलासाठी चांगले होणार नाही. त्यांनी अधिकाऱ्याला एका खोलीत बंद करून मुलाला वरच्या मजल्यावर नेले. आम्ही खाली उभे होतो आणि काही वेळाने आम्हाला गोळ्यांचा आवाज ऐकू आला. व्हिजिलन्स पथकानेच त्याची हत्या केलीयं.