वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची 3 तास पोलीस चौकशी, यूपीएससीसाठीचा आणखी एक प्रकार उघड
pooja khedkar police inquiry: सूत्राच्या माहितीनुसार, वाशिम जिल्हाधिकारी परवानगी घेऊन वादग्रस्त पूजा खेडकर यांनी स्वतःच काही विषय मांडायचे म्हणून संबंधित पोलीस अधिकारी यांना बोलून घेतले. परंतु त्यावेळी काय चौकशी झाली, हे मात्र समोर आले नाही.
वादग्रस्त IAS पूजा खेडकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्या चौकशीसाठी पुणे पोलीस गेल्या असताना त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्या फरार झाल्याची चर्चा रंगली असताना वाशिम पोलिसांनी पूजा खेडकर यांची 3 तास चौकशी केली. या चौकशी दरम्यान वाशिम जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आराज यांच्यासह दोन अधिकारी होते. त्यांनी बंद खोलीत पूजा खेडकर यांची चौकशी केली. या चौकशीनंतर माध्यमांशी बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. यामुळे पूजा खेडकर यांची नेमकी काय चौकशी झाली हे मात्र कळू शकले नाही.
खेडकर म्हणतात, समितीपुढे म्हणणे मांडणार
सूत्राच्या माहितीनुसार, वाशिम जिल्हाधिकारी परवानगी घेऊन वादग्रस्त पूजा खेडकर यांनी स्वतःच काही विषय मांडायचे म्हणून संबंधित पोलीस अधिकारी यांना बोलून घेतले. परंतु त्यावेळी काय चौकशी झाली, हे मात्र समोर आले नाही. दरम्यान माध्यमांशी बोलताना वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी माझ्यावर खूप आरोप होत आहे. जे काही आरोप होत आहे, त्याचे उत्तर मी कमिटीला देईल. माझे म्हणणे समितीपुढे मांडणार आहे, असे म्हटले आहे.
परवानगी नऊ वेळा दिली 11 वेळा परीक्षा
यूपीएससी परीक्षेसाठी पूजा खेडकर यांनी अकरा वेळा स्वतःचे नाव बदलले. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारास सहा संधी असतात. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारास नऊ संधी असतात. परंतु पूजा खेडकर यांनी 11 वेळा परीक्षा दिल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. परंतु त्याला दुजोरा मिळाला नाही. 2020 मध्ये पूजा दिलीपराव खेडकर या नावाचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर 2021 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाचा उल्लेख करण्यात आला. असे एकूण 11 वेळा पूजा खेडकर यांनी आपल्या नावात बदल केला होता.
अहवाल देण्याचे आदेश
पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्याची दखल दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारींना दिले आहेत.
हे ही वाचा… आयएएस पूजा खेडकर…बॅच 2023, प्रशिक्षणार्थी IAS असताना देशभरात चर्चेत, जाणून घ्या A टू Z माहिती