कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर नसतानाही आरोपींकडून करण्यात येत होते गर्भपात

कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पन्हाळा तालुक्यातील पडळमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेश पोवार, हर्षल नाईक असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर नसतानाही आरोपींकडून करण्यात येत होते गर्भपात
कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 10:13 AM

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पन्हाळा (Panhala) तालुक्यातील पडळमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेश पोवार, हर्षल नाईक असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे आरोपी डॉक्टर नसतानाही गर्भपात (Abortion) करत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि अंनिसनच्या वतीने करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही धक्कादयाक घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा मोठा साठा सापडला आहे. संबंधित आरोपींकडे गर्भपातासाठी महाराष्ट्र आणि गोव्याच्या विविध भागातून अनेक रुग्ण आल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणात गर्भलिंग निदान करणाऱ्या अनेक डॉक्टरांची नावही उघडकीस आली आहेत. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्टिंग ऑपरेशनमधून घटना समोर

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पन्हाळा तालुक्यातील पडळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध पद्धतीने गर्भपात सुरू होते. कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि अंनिसनच्या वतीने करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळावरून गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हे डॉक्टर नसताना देखील गर्भपात करत होते. उमेश पोवार आणि हर्षल नाईक असे या प्रकरणातील आरोपींची नावे आहे. या प्रकरणात गर्भलिंग निदान करणाऱ्या काही डॉक्टरांची नावे देखील समोर आले आहे.

गुन्हा दाखल

संबंधित प्रकार गंभीर असून, या प्रकाराने जिल्हात खळबळ उडाली आहे. या प्रकरी आरोपींविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात अन्य काही आरोपींचा समावेश आहे का? याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

Auangabad | शहरातील MIM चे जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, पक्षाच्याच माजी नगरसेवकाची तक्रार

CCTV | उधारी परत करण्याचा तगादा, पुण्यात 34 वर्षीय तरुणाच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

पुण्याहून निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सची टँकरला भीषण धडक, दोन्ही ड्रायव्हरसह तिघांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.