ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या घरामध्ये छापेमारीत 5 पोती भरून पैसे, आलिशान कार आणि सोन्याचे असंख्य दागिने सापडले, वाचा हे नेमके कुठे घडले!

माहितीनुसार, पटना शहरातील सुलतानगंज, पटना येथील गोला रोड, जेहानाबाद आणि गया येथे ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. या पथकाने कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली आहे. जितेंद्रच्या चारही ठिकाणी छापे टाकण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या घरामध्ये छापेमारीत 5 पोती भरून पैसे, आलिशान कार आणि सोन्याचे असंख्य दागिने सापडले, वाचा हे नेमके कुठे घडले!
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 12:27 PM

बिहारच्या (Bihar) पटना शहरातील सुलतानगंज भागातील ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्या घरावर पाळत ठेवत छापेमारी करण्यात आलीयं. छाप्यादरम्यान, पथकाला मोठे घबाड मिळाले आहे. नोटांनी भरलेले पाच पोते, जमिनीची कागदपत्रे, असंख्य सोन्या-चांदींची दागिने, चार आलिशान कार (Luxurious car) इतकेच नाहीतर मोठ्या प्रमाणात बँकांचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आलेत. ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार (Drugs Inspector Jitendra Kumar) यांच्याविरुद्ध दक्षता विभागाने बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाकडून छापा टाकण्याची परवानगी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीयं.

कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त

माहितीनुसार, पटना शहरातील सुलतानगंज, पटना येथील गोला रोड, जेहानाबाद आणि गया येथे ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. या पथकाने कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली आहे. जितेंद्रच्या चारही ठिकाणी छापे टाकण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जप्त केलेल्या मालाचे मूल्यांकन केले जात आहे. आतापर्यंत चार कोटींहून अधिक रक्कम वसूल झाल्याचा अंदाज आहे. नोटा मोजण्यासाठी नोटा मोजण्याची मशिन मागवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

हे सुद्धा वाचा

ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार फरार

डीएसपी सुरेंद्र कुमार मौर यांनी सांगितले की, ड्रग्ज इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सध्या या एफआयआरच्या आधारे जितेंद्र कुमारच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. सध्या जितेंद्र कुमार हे फरार आहेत. त्याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. आतापर्यंत मोठी रोकड, जमिनीची अनेक कागदपत्रे, सोन्या-चांदीचे दागिने, आलिशान गाड्यांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.