माणुसकी मेली, कुत्र्याला हॉकी स्टिकने मारलं, डोळे फोडले, कचऱ्याच्या गाडीत फेकलं, महाराष्ट्रात कुठे घडलं?
शेजारच्या घरात राहणाऱ्या महिलेने हा कुत्रा पाळला होता. हा कुत्रा सतत भुंकायचा. त्याचा त्रास होतो. म्हणून आरोपीने अन्य साथीदारांना सोबत घेऊन हे क्रूर कृत्य केलं.
अकोला येथे माणुसकीला काळीमा फासणारी पशूक्रूरतेची घटना घडली आहे. कुत्रा भुंकतो म्हणून काही क्रूर मानसिकतेच्या नराधमांनी अतिशय क्रूरपणे हॉकी आणि काठ्यांनी श्वानाला मारहाण केली, ज्यामध्ये त्याचे दोन्ही डोळे फुटले. कुत्र्याच्या डोक्याला व जबड्याला गंभीर दुखापत झाली आणि एवढ्यावरच त्यांचं मन भरलं नाही. त्यांनी श्वानाला हात पाय बांधून कचऱ्याच्या गाडीमध्ये फेकून दिलं. श्वान कायमस्वरूपी आंधळा झाला असून त्याच्यावर पुढील उपचार आणि संगोपन आधार फॉर एनिमल्स करत आहे.
या प्रकरणात चार आरोपींच्या विरोधात रामदास पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शेजारच्या घरात राहणाऱ्या महिलेने हा कुत्रा पाळला होता. हा कुत्रा सतत भुंकायचा. त्याचा त्रास होतो. म्हणून आरोपीने अन्य साथीदारांना सोबत घेऊन हे क्रूर कृत्य केलं.
अवैध गोहत्त्येच्या घटनांमध्ये वाढ
अकोल्यात गेल्या काही दिवसात पशू क्रूरता आणि अवैध गोहत्त्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सर्व बाबींकडे पोलीस अधिक्षकांनी वैयक्तिकरित्या लक्ष द्यावं. अकोला पोलीस प्रशासनाने पशूप्रेमींना सहकार्य करावे जेणेकरून अकोल्यात पशुक्रूरता होत असलेल्या मुक्या जनावरांना न्याय मिळेल व लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल.