बाहेर फिरायला जाऊया सांगून मुलांना घेऊन गेला, दोन चिमुकल्यांसह विष प्राशन केले

अंबड रस्त्यावर नेऊन त्याने आधी दोन्ही मुलांना विष पाजले, मग स्वतःही विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मुलांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बाहेर फिरायला जाऊया सांगून मुलांना घेऊन गेला, दोन चिमुकल्यांसह विष प्राशन केले
अज्ञात कारणातून दोन मुलांसह बापाने विष घेतलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 1:28 PM

औरंगाबाद : अज्ञात कारणातून एका कामगाराने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला आहे तर दोन्ही मुलांवर औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भागवत पंजाजी काळे असे मयत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी औरंगाबादेतील सिडको पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या कामगाराने जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कळू शकले नाही.

मयत इसम एका कंपनीत नोकरी करतो

भागवत काळे हा 34 वर्षीय कामगार औरंगाबादमधील एका कंपनीत नोकरी करतो. शनिवारी सकाळी तो आपल्या दोन मुलांना बाहेर फिरायला घेऊन जातो सांगत घरातून घेऊन गेला. यानंतर तो मुलांना घेऊन अंबड रस्त्यावर गेला.

आधी मुलांना विष पाजले मग स्वतः प्यायला

अंबड रस्त्यावर नेऊन त्याने आधी दोन्ही मुलांना विष पाजले, मग स्वतःही विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मुलांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हे सुद्धा वाचा

कारण अद्याप अनभिज्ञ

बापाचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. कामगाराने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सांगलीत 32 विद्यार्थ्यांना विषबाधा

शालेय पोषण आहारातून सांगलीत 32 शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी सिव्हि रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. डाळ-भात खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ होऊ लागले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.