ती अवघी 15 वर्षाची, तो म्हणाला, ‘मी जिवंत, मदत कर’… स्मशानातील त्या घटनेनं पोलिसही हादरले
पोलिसांनी त्याला चकमकीत ठार केले आणि बार्बोस या दहशतवादाचा अंत झाला. पण, त्याच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी पुन्हा एकदा बार्बोसाचे नाव चर्चेत आले आहे.
ब्राझील : ब्राझीलच्या गोयास राज्यामध्ये 27 वर्षीय लाझारो बार्बोस डिसोझा हा शहरातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार. खून, बलात्कार, अपहरण, प्राणघातक हल्ला असे डझनभर गुन्हे त्याच्या नावावर दाखल होते. सीलँडिया येथे 9 जून 2021 रोजी एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करून तो फरार झाला होता. घटनेच्या एका महिन्यानंतर पोलिसांनी त्याला चकमकीत ठार केले आणि बार्बोस या दहशतवादाचा अंत झाला. पण, त्याच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी पुन्हा एकदा बार्बोसाचे नाव चर्चेत आले आहे. तो एका 15 वर्षाच्या मुलीच्या स्वप्नात आला. तिला म्हणाला, मी जीवनात आहे, मला मदत कर. त्यानंतर त्या मुलीने जे काही केले ते पाहून पोलिसांनाही हादरा बसला.
अनेकांच्या जीवाचा थरकाप उडविणाऱ्या लाझारो बार्बोस डिसोझा याचा मृतदेह कबरीतून गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि एकच खळबळ उडाली. दोन वर्षांपूर्वी पोलीस चकमकीत ठार झालेल्या बार्बोसची कबर खोदली कुणी आणि त्याचा मृतदेह गायब कसा झाला हे गूढ पोलिसांना उमगले नाही.
पोलिसांनी बार्बोसच्या कबरीजवळ पहिले तर खरोखरच त्याचा मृतदेह गायब होता. पोलिसांनी तपास सुरु केला. त्यातून धक्कादायक सत्य समोर आले. 15 वर्षीय मुलीने त्याची कबर खोदण्याचे काम केल्याचे निष्पन्न झाले.
तपास पथकाचे नेतृत्व करणारे पोलीस अधिकारी राफेल नेरिस यांनी सांगितले, ती मुलगी अल्पवयीन आहे त्यामुळे तिचे नाव उघड केले जात नाही. सीसीटीव्हीमध्ये काही फुटेज दिसले त्याआधारे त्या मुलीचा माग काढला. त्या मुलीला ताब्यात घेतले असून तिने दिलेली माहिती धक्कादायक आहे असे ते म्हणाले.
बार्बोस याची कंबर खोदणाऱ्या त्या मुलीने सांगितले की, तिला स्वप्न पडले. ती व्यक्ती ( बार्बोसा ) तिच्या स्वप्नात आली. मी कबरीमध्ये जिवंत आहे. मला मदत कर अशी मदत तो मागत होता. त्यामुळे आपल्या 21 वर्षीय मित्रासह कबर खोदून मृतदेह बाहेर काढल्याची कबुली मुलीने दिली.
ती मुलगी आपल्या 21 वर्षीय मित्रासह स्मशानभूमीत गेली. तेथून त्यांनी माती खणून काढत बार्बोसचा मृतदेह बाहेर काढला. त्या दोघांच्या कपड्यांवर स्मशानभूमीची माती सापडली. सध्या या घटनेचा तपास सुरु असून बार्बोस याच्या मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली.