आधी हत्या, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; माजी नगरेवकाच्या आईच्या खुनामुळे परिसरात खळबळ

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एका माजी नगरसेवकाच्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डोंबिवलीतील गोलावली परिसरात ही घटना घडली. (Dombivali former corporator murder)

आधी हत्या, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; माजी नगरेवकाच्या आईच्या खुनामुळे परिसरात खळबळ
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 4:05 PM

ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एका माजी नगरसेवकाच्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डोंबिवलीतील गोलावली परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे ही हत्या माजी नगरसेवकाच्या बापानेच केल्यामुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे. पार्वती पाटील असे माजी नगरसेवकाच्या मृत आईचे नाव असून बळीराम पाटील असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धारदार शस्त्राने वार करुन पार्वती पाटील यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह जाळण्याचासुद्धा आरोपीने प्रयत्न केला. (in Dombivali mother of former corporator has been killed by her husband)

धरादार शस्त्राने हल्ला, महिलेचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील गोळवली परिसरात राहणारे केडीएमसीचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या घरात भांडणाच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. रमाकांत पाटील यांचे 84 वर्षीय वडील बळीराम पाटील आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्यात वाद सुरू होता. वाद टोकाला गेल्यामुळे काही वेळात बळीराम पाटील यांनी पत्नी पार्वती पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. बळीराम पाटील यांनी केलेला हल्ला एवढा घातक होता की या  हल्ल्यात पार्वती पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. एवढेच नाही तर आरोपी बळीराम पाटील याने पार्वती पाटील यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह जाळण्याचादेखील प्रयत्न केला.

घरगुती वादामुळे हत्या झाल्याचा अंदाज

ही घटना घडल्यानंतर मानपाडा पोलिसांनी बळीराम पाटील यांना ताब्यात घेतले आहे. कल्याणच्या डीसीपी विवेक पानसरे एसीपी जेडी मोरे यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पंचनामा करण्यात आला आहे. डीसीपी विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येचे नेमके कारण समोर आले नसले तरी, घरगुती भांडणातून ही हत्या झाली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे.

दरम्यान एका माजी नगरसेवकाच्या आईची हत्या झाल्यामुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या मृत पार्वती पाटील यांच्या नवऱ्यानेच केल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहे. हत्येचं कारण काय असावं असा प्रश्न सर्वांकडून विचारला जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्यची नोंद केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

Crime | संपत्तीचा हव्यास, घराचा ताबा मिळावा म्हणून आईचे शव 10 वर्ष फ्रीजमध्येच लपवले!

दुसऱ्या व्यक्तीशी कसं लग्न करते? विचारत तरुणीवर प्राणघातक हल्ला, एकतर्फी प्रेमातून मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न

सांगलीत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एक आरोपी अटकेत

(in Dombivali mother of former corporator has been killed by her husband)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.