Crime: मारेकऱ्याला हिऱ्याची अंगठी देऊन पोरीनेच दिली बापाच्या हत्येची सुपारी; हत्येचे कारण समजल्यावर पोलिसांनी डोक्याला हात लावला
या मुलीचे एका मुलासह प्रेम संबध होते. मात्र, वडिल या प्रेम प्रकरणात अडसर ठरत होते. यामुळे वडिलांचाच काटा काढायचा असे अपर्णाने ठरवले. मारेकऱ्याला हिऱ्याच्या अंगठी देत तिने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपर्णा, तिचा प्रियकर राजवीर सिंग आणि शूटर निखिल गुप्ता, सेराईकेला-खरसावन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष छोटेराय किस्कू यांचा अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेतले आहे. तसेच फरार 2 आरोपींचा शोध घेत आहेत.
जमशेदपूर : मारेकऱ्याला हिऱ्याची अंगठी देऊन पोरीनेच दिली बापाच्या हत्येची(Murder) सुपारी दिल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये(Jharkhand) घडली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीने पित्याच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. मृत व्यक्तीचे कनेक्शन राजकारणाशी आहेत. मृत व्यक्ती हा एका माजी आमदाराचा मेहुणा आहे. हत्येचे कारण समजल्यावर पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला.
जमशेदपूरला लागून असलेल्या आदित्यपूर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आगे. हरिओम नगर येथील रहिवासी असलेले माजी आमदार अरविंद सिंह यांचा मेहुणा कन्हैया सिंहची हत्या झाली आहे. कन्हैया यांची मुलगी अपर्णा सिंहनेच त्यांची केली आहे.
या मुलीचे एका मुलासह प्रेम संबध होते. मात्र, वडिल या प्रेम प्रकरणात अडसर ठरत होते. यामुळे वडिलांचाच काटा काढायचा असे अपर्णाने ठरवले. मारेकऱ्याला हिऱ्याच्या अंगठी देत तिने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपर्णा, तिचा प्रियकर राजवीर सिंग आणि शूटर निखिल गुप्ता, सेराईकेला-खरसावन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष छोटेराय किस्कू यांचा अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेतले आहे. तसेच फरार 2 आरोपींचा शोध घेत आहेत.
राजवीर सिंह नावाच्या मुलाचे अपर्णा हिच्यासोबत 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यास कन्हैया सिंग सतत विरोध करत होते. तसेच अपर्णा यांना शिवीगाळ करत राजवीर व त्यांच्या कुटुंबीयांना देखील त्यांनी धमकावले होते. मात्र, तरुणीने राजवीरसोबत प्रेमसंबंध सुरू ठेवले. यानंतर कन्हैयाने राजवीरला पुन्हा आपल्या कार्यालयात बोलावून पिस्तुलचा धाक दाखवत मुलीपासून दूर राहण्याची धमकी दिली.
राजवीरच्या कुटुंबीयांचीही कन्हैयाने हत्या केली होती. या घटनेमुळे तो संतप्त होता. तसेच मुलगी अपर्णाला राजवीरसोबतच लग्न करायचे असल्यामुळे ती सुद्धा वडीलांवर नाराज होती. त्यामुळे या दोघांनी कन्हैयाच्या हत्येचा कट रचला. खून करण्यासाठी हिऱ्याच्या अंगठीच्या स्वरुपात शार्प शुटर निखील गुप्ताला सुपारी दिली.
कन्हैयाच्या हत्येनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. चौकशी दरम्यान पोलिसांना कन्हैय्या यांच्या मुलीवर संशय आला. यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर आणि शूटरला ताब्यात घेतले.