क्रूरतेचा कळस…! सख्ख्या बहिणीने महिलेची पहिल्यांदा जीभ कापली, त्यानंतर प्रायव्हेट पार्ट कापला, माणुसकीला काळिमा फासणारी घटना!
सात दिवसांपूर्वी नगर उंटरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगीपूर गावात तंत्रसिद्धीसाठी गुडिया नावाच्या महिलेची हत्या करण्यात आलीयं. पहिल्या दिवशी या महिलेची जीभ कापली. यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला, जीभ कापल्यानंतर महिला जिवंत होती, मात्र प्रायव्हेट पार्ट कापल्यानंतर या महिलेचा तडकाफडकी मृत्यू झाला.
मुंबई : झारखंडच्या (Jharkhand) गढवा जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीयं. अंधश्रद्धेपोटी एका महिलेची तिच्या बहिणीने आणि भाऊजीने अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केलीयं. धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण प्रकार हा अंधश्रद्धेतून घडला आहे. घराच्या बांधकामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी महिलेची हत्या (Murder) करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी (Police) दोन महिलांसह सात आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. सात दिवसांपूर्वी नगर उंटरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगीपूर गावात तंत्रसिद्धीसाठी गुडिया नावाच्या महिलेची हत्या करण्यात आलीयं.
दुसऱ्या दिवशी महिलेचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला
पहिल्या दिवशी या महिलेची जीभ कापली. यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला, जीभ कापल्यानंतर महिला जिवंत होती, मात्र प्रायव्हेट पार्ट कापल्यानंतर या महिलेचा तडकाफडकी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेत मृत महिलेचा नवराही समोर होता, मात्र त्याने यासर्व प्रकाराला विरोध केला नाही. महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेह रांका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरा येथील मामाच्या घरी नेऊन जाळण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी महिलेच्या घरी धाव घेऊन चौकशी केली.
बहिण आणि नवऱ्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. एसडीपीओ प्रमोद कुमार केसरी यांनी सांगितले की, 21 जून रोजी उंटारी पोलिस स्टेशन क्षेत्रातील जंगीपूर गावात मुन्ना ओरावची पत्नी गुडिया देवी हिच्या हत्येची माहिती मिळाली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी रांका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरा गावात असलेल्या स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यात आल्याचेही सांगण्यात आले. योगेंद्र कुमार यांनी या प्रकरणाचा तपास केला. यानंतर महिलेचा पती मुन्ना ओराव, बहीण ललिता देवी, मेहुणा दिनेश ओराव यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.