खळबळजनक! ‘या’ घरात सापडले 5 मृतदेहांचे सांगाडे, एकाच कुटुंबातील सदस्य, त्यांना शेवटच 2019 मध्ये बघितलेलं

एकाच कुटुंबातील 5 सदस्यांच्या मृतदेहांचे सांगाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास सुरु आहे. घराच्या आत अनेकदा तोडफोड झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

खळबळजनक! 'या' घरात सापडले 5 मृतदेहांचे सांगाडे, एकाच कुटुंबातील सदस्य, त्यांना शेवटच 2019 मध्ये बघितलेलं
Skeletal remains of family of 5 found in home
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 1:18 PM

नवी दिल्ली : कर्नाटकच्या चित्रदुर्गमधून एक धक्कादायक बातमी आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका घरात एकाच कुटुंबातील 5 सदस्यांच्या मृतदेहाचे सांगाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकाच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात एका घरात पाच सांगाडे सापडल्याच वृत्त इंडिया टुडेने दिलय. मृतदेहांचे हे अवशेष एकाच कुटुंबातील सदस्यांचे असल्याच म्हटलं जातय.

रिपोर्टनुसार, नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं की, हे कुटुंब पूर्णपणे एकांतात जीवन जगत होतं. या घरातील सदस्य गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करत होते. कुटुंबातील सदस्य शेवटचे जुलै 2019 मध्ये दिसले होते. तेव्हापासून त्यांच घर बंद होतं. दोन महिन्यांपूर्वी सकाळी सैरसपाटा करताना स्थानिक लोकांनी पाहिलं की, घराचा मुख्य लाकडी दरवाजा तुटला आहे. मात्र, तरीही स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली नाही.

घरात मृतदेह कुठे-कुठे होते?

घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास सुरु आहे. घराच्या आत अनेकदा तोडफोड झाल्याचे संकेत मिळाले आहेत. एका रुममध्ये चार मृतदेहांचे सांगाडे सापडले. यात दोन सांगाडे बिछान्यावर आणि दोन जमिनीवर पडलेले होते. एक सांगाडा दुसऱ्या खोलीत सापडला. देवेंगेरेवरुन फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरी (एफएसएल) टीम आणि सीन ऑफ क्राइम ऑफिसर्सना (एसओसीओ) पुरावे गोळा करण्यासाठी बोलावल आहे. घराच्या अवती-भोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृतांची ओळख स्पष्ट होईल. पुढील तपास सुरु आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.