शेजारच्याच तरुणाने मुलीला लग्नाची मागणी घातली, मात्र मुलीकडच्यांनी ती नाकारली, मग पुढे जे घडलं ते भयंकर

शेजाऱ्यानेच मुलीला लग्नाची मागणी घातली. मात्र तरुणाला दारु आणि ड्रग्जचे व्यसन असल्याने मुलीच्या घरच्यांनी नकार दिला. यामुळे तरुणाच्या मनात राग खदखदत होता.

शेजारच्याच तरुणाने मुलीला लग्नाची मागणी घातली, मात्र मुलीकडच्यांनी ती नाकारली, मग पुढे जे घडलं ते भयंकर
लग्नाला नकार दिला म्हणून मुलीच्या वडिलांना संपवलेImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 7:05 PM

तिरुअनंतपुरम : लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून तरुणीच्या वडिलांची शेजाऱ्यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिग्नू, जिजिन, श्याम आणि मनू अशी हल्लेखोरांची नावे आहेत. राजू असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपींनी आधी तरुणीवरही हल्ला केला. तरुणीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. गुरुवारी सकाळी हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र त्याआधीच ही घटना घडली. या हल्ल्यात तरुणीचा आणखी एक नातेवाईकही जखमी झाला आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी जिग्नू याने दोन वर्षांपूर्वी राजू यांच्या मुलीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र राजूला दारु आणि ड्रग्ज व्यसन होते. तसेच त्याने शिक्षणही पूर्ण केले नव्हते. तर तरुणी सायन्समध्ये मास्टर झाली होती. यामुळे मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. याचाच आरोपींच्या मनात खदखदत होता. यानंतर मुलीचे तिच्या सुयोग्य तरुणाशी लग्न ठरवण्यात आले होते.

तरुणीचे गुरुवारी सकाळी लग्न होणार होते. आदल्या दिवशी बुधवारी लग्नाच्या सर्व विधी आटोपले आणि घरचे दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी करत होते. इतक्यात शेजारचे चार तरुण लग्नघरात घुसले. त्यांनी आधी वधूवर हल्ला केला, मग वधूच्या वडिलांच्या डोक्यावर वार केले. यावेळी मुलीची आई बचावासाठी मध्ये आली असता हल्लेखोरांनी तिलाही जखमी केले. मदतीसाठी आलेल्या नातेवाईकालाही आरोपींनी मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

जखमी अवस्थेत मुलीच्या वडिलांना रुग्णालयात नेत असताना आरोपींनी त्यांचा पाठलागही केला. मात्र रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असले तरी पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.