मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने वाद, मग हाणामारीतून तरुणाला संपवले

ताजोद्दीन बाबा दरगाहचा उरूस भरला आहे. या उरुसाच्या निमित्ताने संदल मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत बँडच्या तालावर नाचताना फैजल कुरेशी याचा जैद सय्यद याला धक्का लागला.

मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने वाद, मग हाणामारीतून तरुणाला संपवले
लातूरमध्ये क्षुल्लक कारणातून तरुणाला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 7:56 PM

लातूर / महेंद्र जोंधळे (प्रतिनिधी) : लातूर शहरात उरुसाच्या संदल मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने एका 18 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताजोद्दीन बाबा दर्गाहच्या उरुस निमित्ताने संदल मिरवणूक काढण्यात आली होती. या संदल मिरवणुकीत मोठी गर्दी होती. नाचताना फैजान कुरेशी याचा धक्का आरोपी जैद सय्यद याला लागला. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. या दरम्यान आरोपीने आपल्याकडे असलेल्या चाकूने फैजानवर हल्ला केला. यामध्ये फैजान कुरेशी याचा मृत्यू झाला. ताजाद्दीन बाबा दर्गाह रस्त्यावरील मार्व्हल जिम समोर गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

उरुसच्या निमित्ताने संदल मिरवणूक काढली होती

ताजोद्दीन बाबा दरगाहचा उरूस भरला आहे. या उरुसाच्या निमित्ताने संदल मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत बँडच्या तालावर नाचताना फैजल कुरेशी याचा जैद सय्यद याला धक्का लागला.

नाचताना धक्का लागल्याने वाद

धक्का लागल्याने दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. याच वादातून स्वतःकडे असलेला जैद सय्यद याने चाकू काढून फैजलच्या पोटात वार केला. यामध्ये फैजल हा जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फैजलला लोकांनी शासकीय रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

ही घटना कळताच मोठ्या संख्येने लोक शासकीय रुग्णालय परिसरात एकत्र आले होते. घटनेची माहिती मिळताच विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. आरोपीला अटक करा अशी मागणी मयत फैजलच्या नातेवाईकांनी केली.

आरोपीला अटक केल्यानंतर मयत फैजलवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाचा हकनाक बळी गेला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.