Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MP Crime : मध्य प्रदेशात नात्याला काळिमा; सैनिकाच्या पत्नीवर दिराकडून 18 वर्षे बलात्कार

महिलेचा पती सैन्यात काम करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा महिलेने पतीला त्याच्या मोठ्या भावाच्या अर्थात दिराच्या कृत्याबद्दल सांगितले तेव्हा पतीने पीडित पत्नीची साथ घेण्याऐवजी आपल्या मोठ्या भावाचीच बाजू घेतली.

MP Crime : मध्य प्रदेशात नात्याला काळिमा; सैनिकाच्या पत्नीवर दिराकडून 18 वर्षे बलात्कार
CRIME
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 4:02 PM

ग्वाल्हेर : आजच्या धकाधकीच्या जीवनात नातेसंबंध जपणे दुरापास्त झाले आहे. उलट नातेसंबंधामध्ये अत्याचार वाढले आहेत. अनेकदा महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात असल्याचे उघडकीस येत आहे. असहाय महिला अनेक वर्षे मुकाट्याने तिच्यावर होत असलेले अन्याय-अत्याचार सहन करते. मात्र विशिष्ट काळानंतर तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटतेच. मध्य प्रदेशात उघडकीस आलेले प्रकरण असेच धक्कादायक आहे. पीडित महिलेवरील अत्याचाराला 18 वर्षानंतर वाचा फुटली आहे. कहर म्हणजे तिच्या या अन्यायात तिच्या सैनिक पतीनेही तिला अत्याचाराचा प्रतिकार करण्यास साथ दिलेली नाही. त्यामुळे नराधम व त्याला साथ देणारा पीडित महिलेचा पती या दोघा भावांविरोधात परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित महिलेवर तिच्या मोठ्या दिराकडून बलात्कार

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील नराधम आपल्या लहान भावाच्या पत्नीवर गेल्या 18 वर्षांपासून बलात्कार करत होता. महिलेचा पती सैन्यात काम करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा महिलेने पतीला त्याच्या मोठ्या भावाच्या अर्थात दिराच्या कृत्याबद्दल सांगितले तेव्हा पतीने पीडित पत्नीची साथ घेण्याऐवजी आपल्या मोठ्या भावाचीच बाजू घेतली. घरात राहायचे असेल तर तुला हे सर्व सहन करावेच लागेल, असे पतीने पत्नीला सांगितल्याचे समोर आले आहे.

पीडितेने स्वतःहून केले धाडस आणि पोलीस ठाणे गाठले!

पीडित महिलेने हिंमत दाखवत पती आणि दिराविरुद्ध थाटीपूर पोलीस ठाण्यात बलात्कार व गैरकृत्याला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. महिलेने पोलिसांना सांगितले की, 2003 मध्ये आरोपी दिराने पहिल्यांदा अत्याचार केल्याची घटना घडली होती. तिचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी ती अवघ्या 19 वर्षांची होती. घरच्या प्रतिष्ठेसाठी ती शांत राहिली होती. तिने घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला. त्यावर तिला पतीने साथ दिली नाही.

आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी

पीडित महिलेने अनेक वेळा विरोध करायचा प्रयत्न केला त्यावर नराधम दिराने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ती भीतीने गप्प बसली होती. यानंतर दिराने रोज तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा कसून तपास करून आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांनी केली आरोपी दिरला अटक

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल करून बलात्कार करणाऱ्या दिराला अटक केली आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, ही महिला भिंड येथील रहिवासी आहे. तिचा पती लष्करात आहे. महिलेचा दीर गेल्या अनेक वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. महिलेने याबाबत पतीला माहिती दिली असता त्याने सांगितले की, जर तिला घरी राहायचे असेल तर हे सर्व सहन करावेच लागेल. जेठवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (In Madhya Pradesh, a soldier’s wife was raped by son in law for 18 years)

इतर बातम्या

बायको आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर, मुंबईत 30 वर्षीय नवऱ्याला अटक

दुःखाची संक्रांतः पंतग उडवण्यासाठी जावू दिले नाही म्हणून 12 वर्षीय मुलाचा गळफास; तर पतंग काढताना 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.