AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी करु दिली नाही, विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर दगडफेक

सध्या दहावीची बोर्ड परिक्षा सुरु आहे. यावेळी शासनाने कॉपीमुक्त अभियान राबवले आहे. या अभियानाचे शिक्षकांकडूनही पालन केले जात आहे. मात्र मनमाडमध्ये या अभियानाला हरताळ फासण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी करु दिली नाही, विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर दगडफेक
Image Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 10:56 AM

मनमाड / मनोहर शेवाळे : दहावीच्या पेपर दरम्यान कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यानंतर शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. या हल्ल्यात शिक्षक जखमी झाला आहे. निलेश दिनकर जाधव असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शिक्षकाच्या तक्रारीवरुन मनमाड पोलिसात अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे कॉपीमुक्त अभियानाला शासन गती देत असताना दुसरीकडे मात्र कॉपी करू न दिल्याने शिक्षकावरच हल्ला होत असल्याने ही घटना गंभीर मानली जातेय.

विज्ञान 2 पेपरच्या दिवशी घडली घटना

सोमवारी दहावीचा विज्ञान 2 चा पेपर होता. यावेळी शिक्षक निलेश जाधव यांना बोर्डाच्या परीक्षेत सुपरव्हिजनचे काम सोपवण्यात आले होते. मनमाडमधील हक हायस्कूलमध्ये पेपर सुरु असताना काही विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षक जाधव यांनी मुलांना कॉपी करु दिली नाही.

शिक्षक बाहेर येताच विद्यार्थ्यांकडून दगडफेक

पेपर सुटल्यानंतर नीलेश जाधव हे बाहेर पडत असताना काही मुलांनी जाधव यांच्या दिशेने दगडफेक केली. या हल्ल्यात डोक्याला आणि डोळ्याला दगड लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेप्रकरणी शिक्षक जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व विद्यार्थी कोणत्या शाळेतील विद्यार्थी होते. हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.