Pune Crime News : पुण्यात पोटच्या मुलीची हत्या, वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, पण कारण बाहेर येताचं…
मुलीचे वडिल संदीप शिंदे याच्यावर सध्या ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. याबाबत मुलीच्या आईने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पुणे : पुण्यात (pune crime story) वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या (Murder of a girl) केली, त्यानंतर तीचा मृतदेह जवळच्या कॅनॉलमध्ये फेकून दिला. घरी आल्यानंतर वडिलांनी स्वत : विषप्राशन केलं. त्याचबरोबर स्वत:ला सुध्दा संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर कॅनॉलमध्ये मुलीचा फेकलेला मृतदेह पोलिस अग्नीशमक दलाच्या मदतीने शोधत आहे. घरगुती भांडणामुळे मुलीच्या वडिलांनी हे पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी (pune police) जाहीर केली आहे. वडिलांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांच्यासह घरच्यांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.
पुण्यातील पर्वती परिसरामध्ये असणाऱ्या जनता वसाहत येथे पहाटे तीनच्या सुमारास एका 13 वर्षीय मुलीची हत्या करून तिच्या वडिलांनी कॅनलमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना आली. त्यानंतर संपुर्ण परिसरात खळबळ माजली आहे. यामध्ये आरोपी संदीप शिंदे (वडिल) याने मुलीला कॅनलमध्ये फेकून दिल्यानंतर स्वतःने देखील विष पिऊन आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुलीचे वडिल संदीप शिंदे याच्यावर सध्या ससून रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. याबाबत मुलीच्या आईने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. वडिलांनी हत्या केलेल्या तनुश्री शिंदे हीचा शोध अग्निशामक दलाच्या जवानांकडून सकाळपासून कॅनलमध्ये घेण्यात येत आहे.
पाच तासाहून अधिक वेळ अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध कार्य सुरू आहे, मात्र अजूनही मुलीचा तपास लागलेला नाही. स्वारगेट पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या वडिलांचे आणि आईचे विभक्त होण्यासाठीचा वाद काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यानंतर मुलीच्या आजोबांनी तिच्या वडिलांना विभक्त होण्यासाठीची नोटीस देखील पाठवली होती. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला काल रात्री दहाच्या सुमारास आपला बरोबर घरी आणले. पहाटे तीनच्या सुमारास हत्या करून जवळपास असणाऱ्या कॅनॉलमध्ये मुलीला फेकून दिले. याबाबत वृषाली शिंदे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.