पार्टीच्या बहाण्याने मित्राला बोलावले, मग जे घडले ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !

घराचे बांधकाम सुरु असल्याने तो घराचं काही ना काही सामान खरेदी करत असायचा. मित्रांना वाटायचे त्याच्याकडे खूप पैसा आहे. मग पैशासाठी मित्रांनी जे केले ते मैत्रीला काळिमा फासणारे.

पार्टीच्या बहाण्याने मित्राला बोलावले, मग जे घडले ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !
शारीरिक संबंधाला नकार दिला म्हणून प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 12:30 PM

जालंधर : पैशासाठी मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील जालंधरमध्ये घडली आहे. अवघ्या 1500 रुपयांसाठी एका तरुणाची त्याच्या मित्रांनी हत्या केली. त्यानंतर आरोपींनी मृतदेह कपड्यात गुंडाळून स्कूटीवर नेत डकोहा गेटजवळ फेकून दिला. दानिश असे मयत तरुणाचे नाव आहे. दानिश हा जालंधरमधील ओल्ड रेल्वे रोडवर त्याच्या नातेवाईकांकडे राहत होता. त्याचा एक साथीदार रोहित त्याला पार्टीच्या बहाण्याने आपल्यासोबत घेऊन गेला आणि त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतरच हत्या कशी केली याचा उलगडा होईल.

पैशासाठी मित्रांनी तरुणाला संपवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिशच्या नातेवाईकांच्या घरी बांधकाम सुरू होते. घरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करायचे काम दानिश करत होता. त्यामुळे अनेकदा त्याच्याकडे पैसे असायचे. त्यामुळे त्याच्याकडे जास्त पैसे असल्याचा मित्रांचा समज होता. हे पैसे काढून घेण्यासाठीच मित्रांनी त्याची हत्या केली. मात्र हत्या केल्यानंतर त्याच्या खिशातून केवळ 1500 रुपयेच निघाले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे हत्येचा उलगडा

दानिश मंगळवारपासून अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी पोलिसात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी दानिशचा शोध सुरू केला असता, त्यांना ब्रह्मा नगरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्याचे मित्र दानिशला कपड्यात गुंडाळून स्कूटीवर घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत होते. यानंतर त्यांनी त्याची हत्या करून डकोहा वेशीजवळ फेकून दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.