मोठी बातमी, राजपूत करणी सेना अध्यक्षची गोळी झाडून हत्या, कुठल्या गँगने दिलेली धमकी?

karni sena president sukhdev singh gogamedi shot dead | एका अधिकाऱ्याने सांगितलं, की पोलिसांची एक टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. मृतदेहाच पोस्टमार्टम करण्यात येईल. कुठे घडली घटना? त्यावेळी सुखदेव सिंह कुठे होते? सुखदेव यांच्यासोबत असलेला अंगरक्षकही गंभीर जखमी. कुठल्या गँगने राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाला दिलेली धमकी?.

मोठी बातमी, राजपूत करणी सेना अध्यक्षची गोळी झाडून हत्या, कुठल्या गँगने दिलेली धमकी?
karni sena president sukhdev singh gogamedi shot dead by criminals
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 3:33 PM

जयपूर : राजस्थान जयपूरमध्ये श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुन्हेगारांनी सुखदेव सिंह यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकावरही गोळ्या झाडल्या. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुखदेव सिंह गोगामेडी यांना मृत घोषित केलं. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. श्याम नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. श्याम नगरमध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी आपल्या निवासस्थानी होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. अज्ज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. लॉरेस विश्नोई गँगच्या संपत नेहराकडून सुखदेव सिंह यांना आधी धमकी मिळाली होती, असं बोललं जात आहे. धमकी मिळाल्यानंतर सुखदेव यांनी जयपूर पोलीस ठाण्यात लिखितमध्ये तक्रार नोंदवली होती. आरोपींनी सुखदेव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

आरोपी दोन स्कुटीवरुन आले होते. ते चौघे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम नगरच्या रस्त्यावर सुखदेव सिंह गोगामेड़ी मंगळवारी दुपारी 1.45 च्या सुमारास घराबाहेर उभे होते. त्याचवेळी आरोपींनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. गोगामेड़ी यांना लगेच नजीकच्या मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांचा मृत घोषित केलं. मेट्रो मास हॉस्पिटल बाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली आहे.

पोलिसांकडे सध्या काय अपडेट आहे?

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांची एक टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. मृतदेहाच पोस्टमार्टम करण्यात येईल. पोलिसांची एक टीम घटनास्थळावर आहे. पोलीस परिसरातील आसपासच सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरात लवकर गुन्हयामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यात येईल.

कोणा बरोबर मतभेद झाले?

सुखदेव सिंह आधी राष्ट्रीय करणी सेनेमध्ये होते. पण मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वत:ची स्वतंत्र संघटना स्थापन केली. त्यांनी या संघटनेला श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना नाव दिलं होतं. सध्या तेच या संघटनेचे अध्यक्ष होते. संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटावरुन राजस्थानात विरोध प्रदर्शन झालं होतं. त्यावेळी सुखदेव सिंह यांची अनेक वक्तव्य व्हायरल झाली होती.

कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना

सुखदेव सिंह यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. जयपूर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. खबरदारी म्हणून श्याम नगरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रुग्णालयाबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. रुग्णालय परिसरात मोठा बंदोबस्त आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.