अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या मुलांनीच आईच्या प्रियकराचा काटा काढला, ‘त्या’ हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश

करमाळा शहराच्या हद्दीत एका कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी हत्याकांडाचा उलगडा करण्यास यश मिळवले आहे.

अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या मुलांनीच आईच्या प्रियकराचा काटा काढला, 'त्या' हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश
करमाळ्यातील हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यास यशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 3:41 PM

सोलापूर : जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक घटना सोलापुरात घडली आहे. आईच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या मुलांनी तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेह नाशिकहून करमाळ्यात आणून टाकला होता. मात्र पोलिसांनी 16 तासात गुन्हा उघड करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. करमाळा शहराजवळ अहमदनगर रस्त्यावर थांबलेल्या स्विफ्ट मोटारीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 16 तासांत गुन्ह्याचे धागेदोरे शोधून दोघा बंधूंना अटक केली. आईबरोबर अनैतिक संबंध ठेवल्यामुळे चिडून दोघा भावांनी अन्य एका महिलेसह कट रचून हा खून केल्याचे समोर आले आहे.

आरोपी बंधूंना अटक, गुन्ह्यात महिलेचाही सहभाग

श्रावण रघुनाथ चव्हाण असे हत्या झालेल्या पुरूषाचे नाव आहे. त्याचा भाऊ संभाजी चव्हाण यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींची ओळख पटली आहे. सुनील शांताराम घाडगे आणि राहुल शांताराम घाडगे अशी आरोपी बंधूंची नावे असून, गुन्ह्यात एका महिलेचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. घाडगे बंधुंना अटक करण्यात आली असून, महिला आरोपीचा शोध घेतला जात आहे.

आईसोबत अनैतिक संबंध ठेवल्याने मुलांनी काटा काढला

आपल्या आईबरोबर मृत श्रावण चव्हाण याचे असलेले अनैतिक संबंध उजेडात आल्यामुळे दोघे घाडगे बंधू चिडले होते. त्यांनी एका महिलेला सोबत घेऊन श्रावण चव्हाण याच्या हत्येचा डाव रचला. त्याप्रमाणे त्यांनी श्रावण चव्हाण यास गावात बोलावून घेतले. नंतर एका महिलेसह घाडगे बंधूंनी मिळून श्रावण चव्हाण याचा खून केला. नंतर त्याच्याच स्विफ्ट मोटारीत मृतदेह घालून दूर अंतरावर करमाळा भागात आणून माळरानावर टाकून दिला.

हे सुद्धा वाचा

मोटारीसह मृतदेह अर्धवट जळाला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि सहायक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांनी कौशल्याने तपास करून गुन्हा उजेडात आणला. या गुन्ह्यातील तिसऱ्या महिला आरोपीचा पोलीस शोध घेत असून, तिला लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....